सावधान…….. पॉलिशी करणाऱ्यांनो पोलीस यंत्रणा झाली सतर्क तिघांवर केले गुन्हे दाखल
शिर्डी प्रतिनिधी/ शिर्डी येथील साई मंदिर परिसरात व नगर मनमाड रोड सह लगतचा साईबाबा मंदिर परिसरात पाॅलिसी करणारे एजंटवर परिणामकारक कारवाई करणेबाबत श्री. साईबाबा संस्थान ट्रस्ट चे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर यांचे स्पष्ट आदेश झाले होते.
त्याअनुषंगाने शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार व श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट चे सिविल सुरक्षा रक्षक अशी दिनांक 04/05/2024 रोजी संयुक्त कारवाई करून, साईभक्तांच्या गाड्या अडवून, त्यांना हार फुले प्रसाद घ्या व मंदिरात दर्शन करून देतो
अश्या प्रमाणे पोलिसी करणारे इसम नामे 1. नंदू पांडुरंग जाधव, वय 60 वर्ष, रा. आंबेडकर नगर, शिर्डी 2. अनिल लक्ष्मण कुदळे, वय 30 वर्ष, रा. हिंगणी, ता. कोपरगाव 3. अल्ताफ फारुख शेख, वय- 42 वर्ष, रा. अंबिकानगर, राहाता यांचेवर पोलीस उपनिरीक्षक श्री. रोहिदास माळी, संरक्षण अधिकारी, श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट,
शिर्डी यांचे फिर्यादीवरून भारतीय दंड संहिता कायदा कलम 341 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तरी यापुढे हि अशीच कारवाई सतत चालू राहणार असलेबाबत पोलीस निरीक्षक श्री रामकृष्ण कुंभार यांनी सांगितले आहे.