शिर्डी प्रतिनिधी/ शिर्डी शहरात व्हाईटनर गँगने मोठा उच्छाद मांडला असुन नशेत धुंद असलेल्या या तरुणावर शिर्डी पोलीस कठोर कारवाई करत नसल्याने व खाकीचा धाक वाटत नसल्याने हे तरुण भर रोडवर हातात दगड घेऊन मारामारी करत असल्याचा धक्कादायक प्रकार रविवार दिनांक ५मे रोजी सायंकाळी ८वाजेच्या दरम्यान सुरू होता
नशेत तल्लीन झालेले हे तरुण समुहाने भरधाव वेगाने पळताना दिसत होते मार खाणारा व देणारे हे सगळेच नशेत असल्याने गर्दीत असलेले कोणतेही नागरिक मध्ये पडण्याचे धाडस करताना दिसत नव्हते जिल्हा आधिकारी कार्यालय साई काॅम्पलेक्स शौचालय व हाॅटेल ओम पार्क जवळ मोकळ्या जागेत भांडण करताना दिसत होते या तरुणांनी काही हातगाडी देखील पलटी करुन नुकसान केले व मारहाण देखील केली पण दहशत असल्याने जागरूक नागरिक मात्र भाग घेत नसल्याने या तरुणाचे वाढते धाडस शिर्डी करासाठी व साईभक्तांना वेठीस धरत असल्याने चितांदायक परिस्थिती निर्माण झाली आहे
कधी साईभक्तांना मारहाण कधी मोबाईल व चीजवस्तू घेऊन भरधाव वेगाने पळणारे हे तरुण शिर्डी शहरात कायदा सुव्यवस्था अडचणी मध्ये आणत आहे लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर शिर्डी शहरात बंदोबस्त असताना नशा करण्यासाठी दोनशे रुपये दिले नाही म्हणून काही हातगाड्या देखील पलटी करून हे तरुण पळत सुटले होते नशेसाठी कोणत्याही पातळीवर जाणारे हे तरुण भविष्यात कोणाचा जीव घेण्यासाठी देखील मागे पुढे बघणार नाही
अशी परिस्थिती निर्माण झाली असताना या नशेखोर तरुणांना व नशेचे साहित्य विक्री करणाऱ्या लोकांवर पोलीस कधी कारवाई करणार असा सवाल जणते मधुन विचारला जात आहे नशेत असणारे तरुण गुन्हा करुन कोठेतरी कोपऱ्यात बसलेले असतात यात १८ते २५वयोगटातील हे तरुण असुन रात्रीच्या वेळी नशेत फिरत असतात
त्यामुळे साई भक्तांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे या तरुणावर जिल्ह्याचे अती कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस प्रमुख यांचा धाक राहिला नाही असा प्रश्न शिर्डी ग्रामस्थांना पडला आहे या तरुणांनी लक्ष्मी मंदीर साईश काॅनरवर चार पाच आईस्क्रीम सोडा विक्री करत असलेल्या हातगाड्या पलटी करून देत दहशत निर्माण केली होती