उद्धव ठाकरे काँग्रेसच्या दिशेनं चालले आहेत. थोड्या दिवसांनी त्यांना भगवा ध्वज हातात घेण्याचा अधिकार राहणार नाही, ज्या लोकांचा पाठिंबा ठाकरेंनी घेतलाय. त्याच लोकांच्या विरोधात बाळासाहेब ठाकरे लढले.
पुन्हा याच लोकांना मोठं कारायचं असेल तर येणारी पिढी त्यांना माफ करणार नाही, अशी टीका राज्याचे मंत्री दिपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंवर केलीय. शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी आज शिर्डीत येऊन साईबाबांच्या माध्यान्ह आरतीला हजेरी लावली. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलंय.
साईबाबांच्या दर्शनानंतर प्रसार माध्यमांशी बोलतांना दिपक केसरकर म्हणाले, “शरद पवारांनी कोणत्या पक्षात विलीन व्हावं हा त्याचा विषय आहे. मुळातच ते कॉंग्रेसचे नेते होते. अनेक लोक म्हणतात तुम्ही पक्ष बदलेले आहेत. पक्ष कुठं बदललं, कॉग्रेसचे दोन भाग झाले, त्यात एक राष्ट्रवादी झाली.
मी त्यावेळी पवारांच्या बरोबर राहिलो.” तसंच आता शिवसेनेचे दोन भाग झाले. त्यामुळं मी शिंदे बरोबर जाण्याचं पसंत केल्याचं दिपक केसरकर म्हणाले.
शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांचा प्रचारार्थ आज संगमनेर, श्रीरामपूर या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचार सभा पार पडणार आहे. या सभेसाठी दिपक केसरकर, तसंच अन्य मंत्री व महायुतीचे नेते उपस्थित राहणार आहोत. यासाठी दिपक केसरकर शिर्डीत आले होते.