मतदारांनी मतदान केंद्रात मोबाईलचा वापर टाळावा शिर्डी लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी यांचे आवाहन
शिर्डी,
शिर्डी लोकसभा मतदारसंघात सोमवार १३ मे रोजी मतदान होत असून सर्व घटकातील पात्र मतदारांनी आपली जबाबदारी, कर्तव्य समजून या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन मतदान करावे;
मात्र मतदानाला जातांना मतदान केंद्रात मोबाईलचा वापर टाळावा, असे आवाहन शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी केले आहे.
मतदानाच्या दिवशी पहाटे ५.३० वाजता उमेदवारांच्या मतदान प्रतिनिधींच्या उपस्थित मॉक पोल घेण्यात येणार आहे. यावेळी उमेदवारांचे मतदान प्रतिनिधी ही उपस्थितीत राहणार आहेत. मतदानाची वेळ सकाळी ७.०० वाजता ते सायंकाळी ६.०० वाजेदरम्यान राहणार आहे.
मतदान केंद्रांवर उमेदवारांच्या प्रतिनिधींना मोबाईल वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. तर मतदारांनीही मतदान केंद्रावर जातांना मोबाईलचा वापर टाळावा. मतदानाचे फोटो, व्हिडिओ सोशल मिडियात व्हायरल होऊन गोपनीयतेचा भंग होऊ नये,
यासाठी मतदान केंद्रात मतदारांनी मोबाईलचा वापर टाळावा. मतदारांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता येत्या १३ मे रोजी आपला मताचा पवित्र हक्क बजावून लोकशाहीच्या सक्षमीकरणात योगदान द्यावे, असे आवाहनही श्री. कोळेकर यांनी केले आहे.