हिट अँड रन केस प्रकरणात आरोपीच्या आजोबांचं अंडरवर्ल्ड कनेक्शन
हिट अँड रन केस प्रकरणात आरोपीच्या आजोबांचं अंडरवर्ल्ड कनेक्शन समोर आलं आलं आहे.
अगरवाल कुटुंबाला पोलिसांपासून वाचण्याचा जुना अनुभव दिसत आहे. विशाल अगरवाल यांचे वडील सूर्यकांत अगरवाल यांचे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन सोबत जुने संबध आहेत, अशी माहिती समोर आली आहे.
हिट अँड रान केस प्रकरणात अल्पवयीन मुलाला अटक करून कोर्टकडून १५ तासात जमीन मंजूर झाला होता. यामुळे संतापाची लाट सर्व सामान्य नागरिकांमध्ये पसरली होती.
अल्पवयीन असल्यामुळे आरोपीचे वडील विशाल अगरवाल याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलं आहे. काल संभाजीनगर येथून पोलिसांनी त्याला अटक देखील केली आहे.
अगरवाल याचा भावासोबत जमिनीचा वाद होता. तो सोडवण्यासाठी सूर्यकांत अगरवाल याने अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनची मदत घेतली होती. दरम्यान, अजय भोसले नावाच्या व्यक्तीची हत्या करण्याचा प्रयन्तात सूर्यकांत अगरवाल यांच नाव पुढे आलं होतं.