शिर्डी प्रतिनिधी साईबाबा संस्थानच्या एक हजार रूम साई आश्रम भक्त निवास येथे रोजंदारी वरील आर्थिक परिस्थिती गरिब असलेले कर्मचारी महेश सोनवणे हे काम करतात.
त्यांना आश्रम परिसरात ७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे ४६हजार रूपये किंमतीचे मंगळसूत्र सापडले मात्र पैशाची अडचण कमी पगार वाढलेली महागाई यामुळे अनेक समस्या असताना देखील प्रामाणिकपणा व सेवाभाव दाखवत त्यांनी विभागप्रमुख विजय वाणी यांना माहिती देऊन सदरचे सोन्याचे मंगळसूत्र प्रामाणिकपणे संरक्षण कार्यालयात जमा केले.
त्याचप्रमाणे मदतनीस किरण रमेश बनसोडे याना २६ग्रॅम वजनाचे चांदीचे १६००किमतीचे दागिने (सापडले असता त्यांनी देखील प्रामाणीकपणे संरक्षण कार्यालयात जमा केले. सदर दागिने ज्या साईभक्ताचे हरवले असतील त्यांनी ओळख पटवून संरक्षण कार्यालयातून घेऊन जाणेबाबत संस्थान प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.
साई आश्रम भक्तनिवासचे मदतनिस कर्मचारी महेश सोनवणे व किरण बनसोडे यांच्या या चांगल्या कामाबद्दल श्री साईबाबा संस्थान चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. तुकाराम हुलवळे यांनी शाबासकी दिली. सदर प्रामाणिक कर्मचारी यांना संरक्षण ऑफिसला बोलावून पोलीस उपनिरीक्षक व मंदिर सुरक्षा अधिकारी रोहीदास माळी यांनी त्यांचा सन्मान केला