कोपरगाव शहरातील रहिवासी व मंदावी नागरी सहकारी पतसंस्थेचे व्यवस्थापक विकास जगन्नाथ शिरोडे यांच्या वाणी सोसायटी मधील भावजई वर्षा उमेश शिरोडे यांना पॅशन प्रो या दुचाकीने (क्र.एम.एच.१७ सी.के.७२७६) नुकत्याच दिलेल्या जोराच्या धडकेत त्या गंभीर जखमी होऊन त्यांना आधी कोपरगाव,संगमनेर व नंतर मुंबई येथे उपचार सुरू केले होते.मात्र त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत असल्याने त्यांचे मुंबई येथे आज दुपारी निधन झाले आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”फिर्यादी इसम हे मंदावी नागरी सहकारी पतसंस्थेत व व्यवस्थापक पदावर कार्यरत आहे.त्यांना डी.एन.मार्टचे मालक रामेश्वर दिलीप वाणी यांचा शुक्रवार दि.२४ मे रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास दूरध्वनी वरून संपर्क करून त्यांनी,”इंदिरा पथ येथे आमचे दुकानाचे समोर तुमच्या भावजई वर्षा उमेश शिरोडे यांना एका दुचाकीने जोराची धडक दिली असून त्या त्यात गंभीर जखमी झाल्या असून त्यांना आम्ही कोपरगाव येथील कोठारी हॉस्पिटल येथे उपचारार्थ भरती केले असल्याची माहिती दिली होती.त्या माहितीनुसार त्यांनी तातडीने सदर रुग्णालयात धाव घेऊन परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांना पुढील उपचारार्थ संगमनेर येथील मेडिकव्हर हॉस्पिटल मध्ये उपचारार्थ हलवले होते.
दरम्यान वाणी आणि तेथील नजीकच्या नागरिकांनी दुचाकीस्वार आरोपी इसम विशाल सोपानराव गायकवाड (वय-२८) सुभद्रानगर कोपरगाव यांची गाडी बाजूस घेऊन त्यास ताब्यात घेतले होते.व सदर गाडीचा क्रमांक त्यांना सुपूर्त केला होता.
दरम्यान त्यांना पूढील उपचारार्थ मुंबई येथे दाखल केले होते.मात्र तेथे उपचारा दरम्यान त्यांचे आज निधन झाले असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.
दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं.२४७/२०२४ भा.द.वि.२७९,३३७,३३८,४२७,मोटार वाहन अधनियम १९५४ चे कलम १८४,१७७ प्रमाणे ऑरोपी विरुद्ध गुन्हा दि.२५ मे रोजी दाखल केला होता.मात्र आता शहर पोलिसांना सदर गुन्ह्यात कलमे वाढवावी लागणार आहे.सदर घटनास्थळी पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी भेट दिली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधिकारी हे करीत आहेत.
दरम्यान या कुटुंबाने सदर महिलेचे हृदय,किडनी,लिव्हर आदी अवयव दान केल्याची माहिती हाती आली असून त्याबद्दल नवी मुंबई येथील जिल्हाधिकारी यांनी त्यांचा सत्कार केला असल्याची माहिती हाती आली आहे.त्याबद्दल त्यांचे व त्यांच्या कुटुंबाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.या अवयव दानामुळे अनेकांचे प्राण वाचण्यास मदत होणार आहे