साई सहवासातील भाग्यवान भुमिपुत्रांचा सन्मान सोहळा
असंख्य भक्तांबरोबरच
साईंचा सहवास व सेवा करण्याची संधी तत्कालीन अनेक शिर्डीकरांना लाभली. मात्र बहूसंख्यांच्या नावाचा कुठे उल्लेख न झाल्यामुळे आपले हे पुर्वज काळाच्या पडद्याआड गेले. शिर्डी गॅझेटिअरने शिर्डीतील जवळपास ४७ कुटूंबातील भाग्यवंताना पुन्हा प्रकाश झोतात आणण्याचा प्रयत्न केला आहे.
त्यांच्या साईसेवेला सन्मानित करून त्यांना आदरांजली वाहण्याचा प्रयत्न या निमीत्ताने केला आहे.साईसेवेची संधी लाभलेल्या शिर्डीतील वेगवेगळ्या कुटूंबातील या भाग्यवंत भक्तांचा, आपल्या आजोबा, पणजोबांचा उल्लेख भावी पिढ्यांसाठी एक अनमोल ठेवा ठरणार आहे. आपल्या पुर्वजांची नावे या निमित्ताने देश-विदेशातही
उच्चारली जाणार आहे.
याची कल्पना केली तरी ही बाब आपल्यासाठी किती अभिमानाची आहे याची जाणीव होईल.
साईसेवेची संधी लाभलेली शिर्डीतील भाग्यवंत कुटूंबे-
कोते, गोंदकर, शिंदे, शेळके, जगताप, शेजवळ, गायकवाड, आरणे, गायके, आसने, कुलकर्णी, रत्नपारखी, देशपांडे, नागरे, मिराणे, संकलेचा, लोढा, खाबिया,कवडे, वाकचौरे, सांड, भालेराव, शेख, सय्यद, इनामदार, दारूवाले, पठाण, तांबोळी, बोरावके, सजन, शिंदे, जेजुरकर, कावरे, वारूळे, बर्डे, औटी, आहेर, बिडवे, जाधव, भुजबळ, धाकतोडे, कुंभार, बनकर, कोळी, गुजर, बैरागी, तळेकर इत्यादी.
आपल्या शिर्डी गॅझेटिअरच्या इंग्रजी आवृत्तीचे प्रकाशन १ जुन रोजी सायंकाळी साडेतीन वाजता समाधी मंदिरालगतच्या शताब्दी मंडपात होणार आहे. पद्मश्री,
पद्मभुषण, खासदार आदरणीय सुधा मुर्तीजी यांच्या हस्ते व राज्यसभेचे उपसभापती आदरणीय हरिवंशजी सिंह यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, शिर्डीचे अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, उपकार्यकारी अधिकारी
तुकाराम हुलवळे यांच्यासह साईनगरीच्या आजवरच्या माजी नगराध्यक्ष सह स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती प्रमोद आहेर यांनी दिली आहे