शिर्डी प्रतिनिधी
अयोध्येत बांधण्यात आलेले राम मंदिर हेही एक माझ्या पराभवाचे कारण आहे. कारण शिर्डी लोकसभा मतदारसंघात रावणाला मानणारा आदिवासी समाज मोठ्या संख्येने आहे. त्यांना राम मंदिर रुचले नाही, असे शिंदे गटाचे माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी म्हटले आहे.
दरम्यान सदाशिव लोखंडे पुढे बोलताना म्हणाले की, शिर्डी मतदारसंघात आदिवासी पट्टा आहे. तेथे रावणाला मानणारे बरेच आदिवासी आहेत. त्यांना राममंदिर रुचलेले दिसत नाही. त्याचा फटका मतदानाला बसला. मतदारासंघात राजकीय गटतट मोठे आहेत, या सर्वांचा मला निवडणुकीत फटका बसला आणि मी पराभूत झालो असे सदाशिव लोखंडे यांनी कर्जतमध्ये माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.
सदाशिव लोखंडे यांनी मतदारासंघात राजकीय गटतट मोठे आहेत. कारखानदारांच्या साम्राज्यांचे गटतट आहेत. त्यांच्यात कमालीचा संघर्ष आहे, त्यांच्या संर्घषात माझा बळी गेला असे म्हणत विखे पाटील आणि थोरातांच्या राजकीय वादातून आपला पराभव झाला
असे अप्रत्यक्षपणे म्हटले आहे. तर माझ्या मतदारसंघात आदिवासी पट्टा आहे. तेथे रावणाला मानणारे बरेच आदिवासी आहेत. त्यांना राममंदिर रुचलेले दिसत नाही. त्याचा फटका मतदानाला बसला, असे म्हटले आहे. यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे
कोपरगाव लोकसभा मतदारसंघाच्या विभाजनानंतर 2008 मध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघ तयार करण्यात आला आहे. हा मतदारसंघाच्या निर्मितीपासून (2009 पासून) या मतदारसंघावर शिवसेनेचे वर्चस्व आहे. पण शिवसेनेतील फुटीनंतर या मतदारसंघात यंदा ‘शिवसेना’ विरुद्ध ‘शिवसेना’ म्हणजेच ठाकरे विरुद्ध शिंदे गट अशी लढत झाली होती. 2014 मध्ये उमेदवारी मिळण्यासाठी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये गेलेले माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे पुन्हा शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये परतले.
तर शिवसेना फुटीनंतर सदाशिव लोखंडे यांनी एकनाथ शिंदेंना साथ दिली होती. भाऊसाहेब वाकचौरे विरूध्द सदाशिव लोखंडे असा सामना या निवडणुकीत झाला आहे. शिर्डीमध्ये शिवसेना ठाकरे गटाने मशाल पेटवली आहे. जनतेने भाऊसाहेब वाकचौरे यांना पुन्हा एकदा दिल्लीत जाण्याची संधी दिली आहे.
या विषयी खुलासा करण्यासाठी आज शिर्डी येथे शिवालयात सायंकाळी माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी पत्रकार् परिषदेचे आयोजन केले आहे