शिर्डी शहरात गावठी कट्टा तरुणांकडून हस्तगत
शिर्डी पोलिसांची कामगिरी
शिर्डी प्रतिनिधी/ शिर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीत शनिवार दिनांक 15 जून रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना गुप्त खबरीने दिलेल्या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांच्या पथकाने शिर्डी शहरातील रिंग रोडच्या कडेला असलेल्या हॉटेल सहवास जवळ जाऊन पोलीस पथकाने पाहणी केली असता
अंधारात एक संक्षीत इसम व होता पोलीस पथकाने सीतेफेने ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव सुदर्शन शशिकांत वाणी राहणार साकुरी ता राहता असे सांगितले त्याची अंग झडती घेतली असता त्याच्या कमरेला पॅन्टच्या खोसलेला एक गावठी कट्टा
त्याच्या मॅक्झिनमध्ये एक जिवंत काढतो मिळून आल्याने त्या ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात पोलीस हेड कॉन्स्टेबल केवळ सिंग राजपूत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पुन्हा रजिस्टर नंबर ३५३/२०२४ भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५,७ महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ ( १) (३)सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे हे करीत आहे
सदरची कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला अप्पर पोलीस अध्यक्ष वैभव कलबुर्गी उपविभागीय अधिकारी शिरीष वमणे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून या कारवाईत पोलीस कर्मचारी बाबासाहेब खेडकर केवल सिंग राजपूत सतपाल शिंदे गर्दास घुले यांनी भाग घेतला