साईबाबा संस्थान सुरक्षा रक्षकानातेलगु भाषेचे प्रशिक्षण
शिर्डी प्रतिनिधी / बालाजी नंतर दुसऱ्या क्रमांकाचे धार्मिक तिर्थक्षेत्र म्हणून शिर्डी येथील साईचे मंदिर ओळखले जाते वर्षाकाठी एक कोटी साईबाबांचे भक्त संपुर्ण भारतातील विविध राज्यातून दर्शनाकरिता भाविक येतात. उत्तर भारतातील भाविक हिंदी भाषिक असल्यामुळे त्यांच्याशी संवाद करणेस अडचण येत नाही. परंतु दक्षिण भारतातील भाविकांसोबत संवाद होणेस अडचणी येतात ती अडचण लक्षात घेत सुरक्षा रक्षकांना त्यांच्या भाषेत संवाद करता आला पाहिजे यासाठी भाषेचे ज्ञान देण्यासाठी प्रशिक्षण मेळावा संपन्न झाला
अधिक माहिती अशी की शिर्डीत दक्षिणे कडील राज्यातील भाविक जास्त प्रमाणात शिर्डी येथे येत असतात. बऱ्याच वेळा भाषेचा अडसर असल्यामुळे संस्थान कर्मचारी. आणि भाविक यांच्यात गोंधळ होत असतो . मातृ भाषेतून संवाद झाला तर भक्तांना आपुलकी वाटते. त्याकरिता मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. तुकाराम हुलवळे यांच्या सुचणे नुसार सर्व संस्थान कर्मचारी यांना तेलगू भाषेचे जुजबी ज्ञान व्हावे याकरिता भाषा प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात यावेत. असे आदेश होते त्यानुषंगाने आज रोजी संरक्षण विभागातील सुरक्षा कर्मचारी यांचेकरिता प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला.सदर कार्यक्रमाला प्रशासकीय अधिकारी श्रीमती प्रज्ञा महांडुळे, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, संरक्षण अधिकारी पोलिस उपनिरीक्षक रोहिदास माळी हजर होते.