अचानक दोन तरुण गेल्याने शिर्डीत शोकाकाळ एक तरुण पाण्यात बुडाला एकाने केली आत्महत्या
शिर्डी येथील ६ मुले भंडारदरा येथे फिरण्यास गेले होते त्यातील तीन मुले धरणात आंघोळ करीत होते त्यातील सद्दाम सलीम शेख वय वर्ष 26 या तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला सद्दाम शेख हा आपल्या मित्रांसोबत भंडारदरा येथे पर्यटनासाठी आला होता आणि त्याचे दोन मित्र भंडारदरा धरणात आंघोळ करण्यासाठी उतरले होते आंघोळ करत अचानक पाण्यात बुडाला सद्दाम हा कशा पद्धतीने पाण्यात बुडाला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया वर व्हायरलं झाला आहे आज शनिवारी सकाळी 11सदर् घटना घडली घडली आहे सद्दाम याची शिर्डीत अंडाभुर्जीची गाडी होती त्याचे नुकतेच लग्न झाले होते आणी त्यास ५ महिन्याची मुलगी आहे घटनास्थळी राजूर पोलीस ठाण्याचे एपीआय दीपक सरोदे अशोक गाडे अशोक काळे दिलीप दगडे हे तात्काळ दाखल झाले व त्यांनी स्थानिकांच्या मदतीने सद्दाम यास बाहेर काढले ही बातमी शिर्डीत कळताच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे दुसर्या घटनेत शिर्डी येथील श्रीरामनगर येथील रिक्षा बबलू शेख वय ३६ याने स्वताच्या राहत्या घरात आत्महत्या केली आहे