राहता तालुक्यातील खळबळ जनक घटना
शिर्डी प्रतिनिधी/शिर्डी लगत असलेल्या कोराळे गावात जन्मदाते वडील गणपत संभाजी कोळगे वय ८०याच्याकडे त्याचा मुलगा अनिल गणपत कोळगे वय ५३ हा शेतजमीन नावावर करुन देण्यासाठी मागे लागला होता मात्र वडील मागणी पूर्ण करुन देत नाही या भावनेतून २४जुन रोजी सायंकाळी घराच्या जवळच्या शेडमध्ये असताना वडील गणपत कोळगे यांना काठीने बेदम मारहाण केली त्याचा खुन करुन आरोपी मुलगा घटनेनंतर अनिल कोळगे पसार झाला होता उपविभागीय अधिकारी शिरिष वमणे पोलीस निरीक्षक सोपान काकड याच्या मार्गदर्शनाखाली आरोपीचा शोध शिताफीने सुरू होता संदरचा आरोपीची माहिती पोलीस पथकाला मिळताच पोलीस कर्मचारी कमलाकर चौधरी विशाल पंडोरे श्रीकांत नरोडे विनोद गंभिरे संभाजी शिदे यांनी त्यास अटक केली असून राहता पोलीसांनी आरोपी आनिल कोळगे याच्या विरोधात भादवी ३०२प्रमाणे गुन्हा दाखल केला असून आधिक तपास राहता पोलीस करीत आहे
जाहिरात