लोणवळा येथील भुशी डॅम परिसरात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू होण्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. ही पहिलीच घटना नसून अशा घटना पावसाळ्यात वारंवार होत आहेत, मात्र अशा दुर्घटना होऊ नयेत, म्हणून राज्य सरकारने पर्यटकांच्या सुरक्षेसाठी काय व्यवस्था निर्माण केली आहे? असा प्रश्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेत विचारला.पावसाळ्यात लोणावळ्याप्रमाणेच राज्याच्या इतर भागातही पर्यटक मोठ्या संख्येने भेटी देत असतात.
पावसाळ्यातील पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने राज्य सरकारने काय उपाययोजना केल्या आहेत, ते सरकारने स्पष्ट करावे, अशी मागणी पटोलेंनी केली. विधिमंडळात स्थगन प्रस्ताव मांडत नाना पटोले यांनी भुशी डॅम दुर्घटनेकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले. भुशी डॅमवर घडलेल्या या दुर्घटनेत नूर शाहिस्ता अन्सारी (वय ३५), अमिना अदिल अन्सारी (वय १३), मारिया अन्सारी (वय ७), हुमेदा अन्सारी (वय ६) आणि अदनान अन्सारी (वय ४, सर्व रा. सय्यदनगर, हडपसर) हे सर्व पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले आहेत. यापैकी तिघांचे मृतदेह काल सापडले होते. तर आज आणखी एकाचा मृतदेह सापडला आहे. एकजण अद्यापही बेपत्ता आहे. त्याचा शोध सुरु आहे
.लग्नसोहळ्यासाठी अन्सारी कुटुंब आणि नातेवाईक एकत्र आले होते. २७ तारखेला लग्न झालं. गुलजार अन्सारी यांचे तारिक अन्सारीसोबत लग्न झाले. त्यानंतर दोन दिवसांपासून सगळ्यांचं पावसाळी पिकनिकचं प्लॅनिंग सुरु होतं. रविवार ३० तारखेच्या सकाळी सर्व जण भुशी डॅम परिसरात आले. ते एकूण १७ जण होते, टेम्पो ट्रॅव्हलरने सगळे जण आले होतेलोणावळ्याच्या ज्या धबधब्यात अन्सारी कुटुंब वाहून गेलं.
तिथे एरवी पाण्याचा फारसा प्रवाह नसतो. दुर्घेटनेच्या आधीही पाण्याचा प्रवाह फारसा नसल्याने अन्सारी कुटुंबा तिथल्या खडकावर उभं राहून मजा मस्ती करत होते. पण मुसळधार पाऊस सुरु झाला आणि पाण्याचा प्रवाह अचानक वाढला. अचानक वाढलेल्या पाण्यामुळे एका महिला, दोन मुली आणि दोन लहान मुलं खडकावरच अडकले. त्यांना वाचवण्याचा बराच प्रयत्न करण्यात आला. पण दु्र्देवाने पाण्याच्या प्रवाहात पाचही जण वाहून गेले