युवराजलाही साईबाबांच्या दर्शनासाठी घेवून येणार.. युरावज सिंह यांच्या आई शबनम सिंह यांनी घेतले साईबाबांचे मनोभावे दर्शन
परिवारातील सर्वांचा सुख शांतीसाठी साईबाबांच्या चरणी प्रार्थना केली आहे. साईबाबा न मागताच सर्वकाही मनोकामना पूर्ण करतात. साईबाबांचे दर्शन घेवून मनाला शांती आणि समाधान मिळत असल्याच भारतीय टीमचे माजी क्रिकेटपटू युरावज सिंह यांच्या आई शबनम सिंह साईबाबा दर्शनानंतर “ई टीव्ही भारतशी” बोलतांना म्हणल्या आहे.
शिर्डी साईबाबांच्या निश्म साईभक्त असलेल्या शबनम सिंह यांनी न चुकता यावेळीही साईबाबा संस्थानाला देणगी दिलीय. यावर बोलतांना शबनम म्हणल्या की मी जी देणगी संस्थानला दिली आहे. ती मुलांचा शिक्षणासाठी दिली आहे. एक मुलगा शिकला तर देशाचे भविष्य बनेल यासाठी मी साईबाबा संस्थानाला देणगी देत असते.
T20 विश्वचषक भारताने जिंकल्या यावर बोलतांना शबनम म्हणल्या की जगातील एक नंबरची इंडिया टीम आहे. युरावज सिंह भारतात आल्या साईबाबांचे बोलावणे आल्यावर युवराजला पण साईबाबांच्या दर्शनासाठी घेवून येणार असल्याच शबनम म्हणाल्या आहे.
भारतीय टीमचे माजी क्रिकेटपटू युवराज सिंह यांच्या आई शबनम सिंह यांनी आज शिर्डीत येवून साई मंदिरात जावून साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतलंय. यावेळी शबनम यांनी साईबाबांच्या दुपारचा माध्यहन आरतीलाही हजेरी लावलीय. साईबाबांच्या दर्शनानंतर मंदिर परिसरातील देणगी कार्यलायत जावून शबनम यांनी संस्थांनाला देणगीही दिली आहे. दरम्यान साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी शबनम यांचा साईबाबा मुर्ती व शॉल देवून सत्कार केलाय.