लाडकी बहीण योजनेला डिजिटल फलक व चमकोगिरीमुळे महिलांना मोठा मनस्तापनानासाहेब काटकर यांचा आरोप
शिर्डी प्रतिनिधी/ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांचे स्वावलंबन पोषण व सर्वांगीण विकासासाठी २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे तर वर्षाला १८ हजार रुपये देण्याचा धोरणात्मक निर्णय महायुती सरकारने जाहीर केला आहे यासाठी जशी मुदत वाढवली तशी काही कागदपत्रे देखील कमी केली असताना नगर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी लावलेले काही डिजिटल बोर्डमुळे महिलांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे त्यामुळे शासकीय यंत्रणेनेच नेमकी किती कागदपत्र लागणार आहे त्यासाठी फलक लावून व प्रसिद्धी माध्यामातून जनप्रबोधन करावे अशी मागणी शिर्डी येथील राष्ट्रीय समाज पक्षाचे उत्तर नगर जिल्ह्या अध्यक्ष नानासाहेब काटकर यांनी जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्याकडे केली आहे
हजार पाचशे रुपयांचा डिजिटल बोर्ड त्यावर नेता व पदाधिकाऱ्याचा हसरा फोटो व काही हौशी राजकीय चमको कार्यकर्ते यांनी सोशल मीडियावर नेत्याचे फोटो व त्याखाली आपले फोटो व पद टाकून त्यात असलेला मजकूर लागणारी कागदपत्रे योजनेसाठी लाभार्थ्याची पात्रता लाभार्थी याची माहिती असलेले डिजाईन व्हायरल करत असल्याने महिलांचा मोठ्या प्रमाणावर गोंधळ होत असल्याने कौटुंबिक मनस्ताप सहन करावा लागत आहे त्यासाठी शासकीय यंत्रणेनेने आता ज्या प्रमाणात दुरुस्ती केली आहे त्या आधारे किती कागदपत्रे लागणार आहे याचे प्रबोधन व जनजागृती करावी अशी मागणी आता राष्ट्रीय समाज पक्षाचे नगर जिल्ह्यातील अध्यक्ष नानासाहेब काटकर यांनी केली आहे