केवायसीच्या माहिती मध्ये साधर्म्य न आढळल्यास एकही सिलिंडर मिळणार नाही
केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गित वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्या माहितीनुसार सरकारी पेट्रोलियम कंपन्या बनावट ग्राहकांना यादीतू हटवण्यासाठी सध्या आधार कार्डच्या माध्यमातून e-KYC व्हेरिफिकेशन करत आहे. ज्या धर्तीवर आता माहितीमध्ये साधर्म्य न आढळल्यास अशा ग्राहकांच्या वाट्याला येणारा LPG सिलिंडर पुरवठा बंद करण्यात येणार आहे. ज्या ग्राहकांच्या नावावर असणाऱ्या एलपीजी सिलेंडरचा व्यावसायिक वापर केला जात आहे, अशांचीही नावं यादीतून वगळली जाणार असल्यामुळं हा मोठा धक्का ठरणार आहे. पुरी यांनी X च्या माध्यमातून केलेल्या पोस्टनुसार सध्या पेट्रोलियम कंपन्यांकडून ई केवायसीच्या माध्यमातून ग्राहकांची पुन:पडताळणी करण्यात येत आहे. ज्यानंतर बनावट पुराव्यांच्या आधारे सिलिंडर मिळवणाऱ्या ग्राहकांवर चाप लावला जाणार असून, मागील आठ महिन्ययांपासून ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामध्ये मोबाईल फोनवर अॅपच्या माध्यमातून पुष्टी केली जाते. याशिवाय ग्राहकांकडे गॅस वितरक कंपनीच्या मदतीनं e-KYC पूर्ण करण्याचीसुद्धा मुभा असते. देशात सध्याच्या घडीला 32.64 कोटी सक्रिय घरगुती एलपीजी वापरकर्ते असून, आता यापैकी नेमकी कितीजणांवर कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.