कोपरगाव तालुक्यातील मुर्षतपुर शिवारात म्हसोबानगर,शिवरोड या ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी घराची कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश करून कपाटाच्या आतील कप्प्यातील ४५ हजारांची रोख रक्कम,एक तोळा सोन्याची पोत,०४ ग्रॅम वजनाचे कानातील वेल,तितक्याच वजनाचे टॉप्स आदी ०१ लाख ०५ हजारांचा ऐवज (आजचे १.७१ लाख मूल्य) लंपास केला असल्याची गुन्हा फिर्यादी सतीश कचेश्वर रक्ताटे (वय-३३) यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
सदरचे सविस्तर वृत असे की,कोपरगाव शहरात चारचाकी व दुचाकी वाहनांची चोरीचा शोध घेतला असता पोलिसांना मागील पंधरवाड्यात पोलिसांनी जवळपास २७ दुचाकी चोरणारी टोळी गजाआड केली असून त्याबाबत नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले असताना दि.०९ जुलै रोजी रात्री १० वाजे नंतर अज्ञात चोरट्यांनी मारुती डिझायर ही तीन लाखांची गाडी चोरी झाली असताना त्या बातमीची शाई वाळलेली नसताना आज मुर्षतपूर शिवारात शिवरोड,म्हसोबानगर येथे एक चोरी उघडकीस आली आहे.या प्रकरणी फिर्यादी सतीश रक्ताटे यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान त्यांनी आपल्या फिर्यादीत म्हटलं आहे की,” बुधवार दि.१० जुलै रोजी रात्री १० वाजेनंतर आपण व आपल्या कुटुंबातील सदस्य झोपी गेल्या नंतरअज्ञात चोरट्याने पाळत ठेवून व आपण झोपी गेल्यावर आपल्या घराच्या दाराची आतील कडी व कोयंडा तोडून आत प्रवेश करून कपाटातील लॉकर मध्ये ठेवलेली रोख रक्कम ४५ हजार (त्यात ५०० रुपये किमतीच्या नोटा),३० हजार रुपये किमतीची एक तोळा सोन्याची पोत,१५ हजार रूपये किमतीचे ०४ ग्रॅम वजनाचे कानातील वेल,तितक्याच वजनाचे टॉप्स आदी एकूण ०१ लाख ०५ हजारांचा ऐवज (आजचे सोन्याचे मूल्य जवळपास १.२६ लाख एकूण चोरी मूल्य १.७१ लाख) लंपास केला आहे.आपल्याला सकाळी जाग आली असता ही घटना उघडकीस आली आहे.
दरम्यान या प्रकरणी फिर्यादी सतीश कचेश्वर रक्ताटे (वय-३३) यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान घटनास्थळी पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख,सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा,पोलीस हे.कॉ.किशोर जाधव आदींनी भेट दिली आहे.
दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं.३१३/२०२४ नवीन भारतीय न्याय संहिता कलम ३३१(४) ,३०५,(अ) अन्वये दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप देशमख यांचे मार्गदशनाखाली पो.हे.कॉ.जाधव हे करीत आहेत.