दलित तरुणास मारहाण कठोर कारवाई करा नगरसेवक सुरेश आरणे
शिर्डी / येवला येथील प्रसाद खैरनार,या १७ वर्षाचा मुलाला गावगुंडांनी केलेल्या अमानुष पणे हल्ला करून अर्धनग्न करून बेदम मारहाण काही गुंड प्रवृत्तीच्या तरुणाकडुन करण्यात आली होती त्या अनुषंगाने ११जुलै रोजी घटनेच्या निषेधार्थ आज हजारोच्या संख्येने दलीत समाज जमा होऊन निषेध केला,
त्या प्रसंगी,विष्णू भाऊ कसबे( राज्य मातंग समन्वयक)दीपक भाऊ केदार, नगरसेवक सुरेश आरणे (दलीत पेंथर),सुभाष शेजवळ,(साहित्य रत्न लोक.आण्णा भाऊ साठे, फाऊडेश नाशिक,)निलेश सरोदे,विराट प्रतिष्ठान म.राज्य) तसेच शिर्डी शहरातून३०० कार्यकर्ते ह्या प्रसंगी हजर होते,
या प्रसंगी बोलताना सुरेश आरणे म्हणाले की किरकोळ कारणावरून बेदम मारहाण करणे नग्न करणे हा प्रकार चुकीचा असुन येवला पोलीसांनी आरोपींना जलदगतीने अटक करावी सुधारित कायद्यानुसार गुन्हे दाखल करावे आरोपींना लवकर जामीन होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच कठोर कलमे दाखल करुन कडक कारवाई करावी अशी मागणी केली असता येवला येथील पोलीस उपनिरीक्षक डि एम लोखंडे यांनी सागितले की चार आरोपी अटक काही फरार आहे
त्याना देखील अटक केली जाईल गणेश शिदे, निलेश परदेशी साई परदेशी, वैभव मोहारे ,गणेश परदेशी व एक जण अज्ञात अ
शा आरोपीवर अनुसूचित जाती जमाती सह भादवी ३२०,३२४,१४३,१४७,१४८,१४९,३६३,५०४,३२३,५०६ तसेच नग्न करून व्हायरल करणे ३५४ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे असे सांगितले गुन्हेगारांना अटक करून शिक्षा होईल यासाठी पोलीसांनी प्रयत्न करावा अन्यथा सुरेशआरणे म्हणाले प्रसंगी पुढील ८ दिवसात नाशिक येथे महा आक्रोश मोर्चाचे नियोजन झाले असून त्यात इतर काही कलम लावण्यासाठी वेळ प्रसंगी विधानसभेवर मोर्चा देखील काढून शासनाचे लक्ष वेधून घेतले जाईल असे म्हटले