Letest News
पोलिसांनीच त्यांची हत्या केली आहे मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना पाठिशी घातलं राहुल गांधी ना.राधाकृष्ण विखे जलसंपदा मंत्री झाल्यानंतर त्यांचा लोणी येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून सत्कार! shirdi news साईंच्या झोळीत साईभक्तांनी टाकले भरभरून दान गांधी भारताचे नव्हे तर पाकिस्तानचे राष्ट्रपिता भट्टाचार्य साईंची मूर्ती खरंच झीझली आहे का? तज्ञांनी दिलेल्या सुचनेने चर्चेला उधान!!साई संस्थान मूर्तीची काळजी ... बनावट दर्शन पास या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस स्टेशनला फिर्याद का नाही? shirdi saibababa news श्री साईबाबा संस्थानची नाताळ व नूतन वर्षाची तय्यारी पूर्ण प्रशासन सज्ज मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस प्रथमच अहिल्यानगर जिल्ह्यात! शिर्डी विमानतळावर करण्यात आला सत... पांढऱ्या कापडात गुंडाळलेल्या ५ वर्षाच्या मुलाचा मृतदेह गोदावरीच्या पात्रात मिळाला शिर्डी येथिल शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते चंद्रकांत गायकवाड यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई निवृती गायकवाड...
अ.नगरक्राईम

स्वच्छ प्रतिमेचे देवदूत असलेले एल सी बीचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर हफ्ते घेतात? आहो लंके साहेब राजा हरिश्चंद्र नंतर लोक दिनेश आहेर यांची शपत घेतात? 

 

sai nirman
जाहिरात

पोलीस खात्यातील स्थानिक गुन्हे शाखेमध्ये सुरू असलेल्या हप्तेखोरीकडे खासदार नीलेश लंके यांनी लक्ष वेधले असून गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, उपनिरीक्षक सोपान गोरे यांच्यासह शाखेतील कर्मचाऱ्यांची खा. लंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, विरोधी पक्ष नेते विजय वडेटटीवर, अंबादास दाणवे, पोलीस महासंचालक, पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. सात दिवसांत कारवाई न झाल्यास नगरच्या पोलीस अधिक्षक कार्यालयापुढे सबळ पुराव्यांसह उपोषण करण्याचा इशारा खा. लंके यांनी दिला आहे.

DN SPORTS

kamlakar


यासंदर्भात खा. लंके यांनी पाठविलेल्या पत्रामध्ये नमुद करण्यात आले आहे की, संतांची पावनभुमी असलेल्या नगर जिल्हयामध्ये काही वर्षांपासून जनतेचे रक्षक असणारे पोलीस खात्यामधील स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे व इतर कर्मचारी राजरोसपणे हप्ते घेत असल्याचा आरोप खा. लंके यांनी केला आहे.
जिल्हयात गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले असून महाराष्ट्रात सर्वात जास्त गुन्हेगारी असणारा जिल्हा म्हणून नगर जिल्हा ओळखला जातो. बीफ मटन, ऑनलाईन क्लब, वाळू, गुटखा, दारू, गांजा, चंदन तस्करी, मटका, बिंगो हे सर्व व्यवसाय पोलीसांच्या आशीर्वाद व आश्रयाखाली मोठया प्रमाणात सुरू असल्याचे खा. लंके यांनी नमुद केले आहे.


स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी, कर्मचारी सामान्य जनतेस वेठीस धरीत आहेत. जिल्हयातील सुवर्णकार व्यवसाय करणारे सराफ व्यवसायीकांना दमदाटी करून खोटया गुन्हयांमध्ये अडकवू असे धमकावतात. जिल्हयामध्ये इतर सर्व कारणांमुळे गुन्हेगारी वाढत चालली आहे. नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण तयार झाले आहे. अनेकांचे संसार उध्वस्त झाल्याच्या तक्रारी वारंवार माझ्याकडे स्थानिक नागरीकांनी केल्या आहेत व करीत आहेत. या प्रकरणातील अधिकारी, कर्मचारी यांच्यावर विशेष दर्जा असणा-या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून दोषींवर सात दिवसांत कारवाई करण्यासंदर्भात आदेशित करण्यात येऊन सर्व अवैध व्यवसाय बंद करण्यात यावेत अशी मागणी खा. लंके यांनी केली आहे.

हप्ते गोळा करणारे हे आहेत कर्मचारी

रविंद्र आबासाहेब कर्डीले व त्याचे गुन्हे शाखा विभागातील सहकारी शहाजी आढाव, अमोल भोईटे, रणजित जाधव, रोहित मिसाळ, विजय ठोंबरे, शिवाजी ढाकणे, सिचन आडबल, मनोज गोसावी बापू गोसावी हे हप्ते गोळा करण्यासाठी मदत करीत असल्याचे खा. लंके यांनी तक्रारीत नमुद केले आहेत.

आर्थिक लोभापाई दोन अस्थापनांचा कार्यभार

रविंद्र कर्डीले याची शिर्डी येथील साई मंदीर सुरक्षा विभागात नेमणूक असताना देखील तात्पुरत्या स्वरूपात सायबर सेल नगर येथे बदली करण्यात आली आहे. तसेच स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखा व सायबर सेल या दोन अस्थापना असून हे दोन विभाग स्वतंत्र असताना देखील या दोन्ही शाखांचा कार्यभार पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्याकडे आहे. स्थानिक गुन्हे शाखेत अनेक गुन्हे प्रलंबीत आहेत हे निश्‍चित संशयास्पद असून पोलीस निरीक्षक आहेर यांच्याकडे दोन्ही शाखेचा कार्यभार हा फक्त आर्थिक लोभापाई असल्याची तक्रार लंके यांनी केली आहे.

रविंद्र कर्डीले मास्टरमाईंड

या प्रकरणाचा मास्टर माईंड रविंद्र अबासाहेब कर्डीले हा असून त्याच्यावर काही वर्षांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेत काम करताना लाचलुचपत विभागाने कारवाई केलेली आहे. सबंधित केस जिल्हा न्यायालयात प्रलंबित असून नगर शहरातील एका गुन्हयामध्ये राज्य गुन्हे अन्वेशन शाखेमार्फत चौकशी सुरू आहे. कर्डीले यांच्यावर इतर गुन्हेही असून तो इतर पोलीसांवर दबावतंत्र वापरतो. तरीही अशा कर्मचाऱ्यावर पोलीस खात्याकडून कुठलीच कार्यवाही होत नाही ही खेदजनक बाब असल्याचे खा. लंके यांनी या पत्रात नमुद केले आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button