शिर्डी नगर परिषद कडून शासकीय आदेशाला कराची टोपली सर्व सामान्य लोकांनी कोणाचा आदर्श घ्यावा अमृत गायके
महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या प्लेक्सबोर्डचा वापर सर्रास्पणे केला जात असल्याची तक्रार अमृत गायके यांनी जिल्हाधिकारी यांच्या कडे केली तक्रारीत म्हटले आहे की शिर्डी हे जागतिक कीर्तीचे देवस्थान असून मोठ्या प्रमाणात श्री. साईभक्त श्री. साईबाबांच्या दर्शनाकरता येत असतात. सुट्टीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात साईभक्तांची गर्दी शिर्डीत होत असते, शिर्डी नगरपरिषदने सर्वसाधारण सभा १७/०७/२०२३ अन्वये शिर्डी शहरात संपूर्ण फ्लेक्स बंदी बाबतचा विषय क्र.५९ ठराव केलेला आहे, परंतु शिर्डी नगरपरिषदेकडून कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई करत नसल्याने शिर्डी शहरात सर्वत्र बेकायदेशीरपणे फ्लेक्स बोर्ड लावले जातात. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण दृश्य पहावयास मिळते. शिर्डी हे जागतिक कीर्तीचे देवस्थान असल्याने शहरामध्ये अशा गोष्टींना आळा बसण्याची सक्त गरज आहे.
सदरचे बोर्ड हे लावल्यानंतर आठ आठ दिवस कुणीही काढत नाही त्याचप्रमाणे इतर वेळी विविध पक्षाचे पक्षाचे स्वागत करण्यासाठी व इतर कार्यक्रमासाठी पक्षाचे बोर्ड फ्लेक्स मोठ्या प्रमाणात स्ट्रीटलाईट पोलवर शहरात इतर ठिकाणी लावले जातात व कार्यक्रम झाल्यानंतर देखील हे बोर्ड फ्लेक्स काढले जात नाही.
पर्यायाने बोर्ड फ्लेक्स काढण्यासाठी शिर्डी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना काढावे लागतात उंच उंच ठिकाणी विविध पक्षाची फ्लेक्स बोर्ड हे उंच उंच ठिकाणी लावले जातात. नुकतेच मुंबई शहरामध्ये घाटकोपर येथे बेकायदेशीरपणे असलेला जाहिरातीचा बोर्ड वादळी वाऱ्यामुळे कोसळून मोठी दुर्घटना होऊन बरेच जण मृत्युमुखी व जखमी झालेली ताजी घटना आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असून मोठ्या प्रमाणात सोसाट्याचा वारा व वादळी पाऊस सुरू असल्याने शिर्डी मध्ये मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तसेच नगर मनमाड रोड तसेच पिंपळवाडी रोड, पालखीरोड, भोजनालय रोड, हॉटेल सन अँड संड
रोड, मनोजकुमार पथ, शिर्डी शहरात विविध रस्त्यावर मोठ मोठी जाहिरातीचे होर्डिंग बोर्ड लावले असून त्याची संख्या सुद्धा शहरात मोठ्या प्रमाणात आहे. त्याचे सुद्धा स्ट्रक्चरर ऑडिट होणे गरजेचे आहे. शिडर्डी मध्ये साई भक्तांची व नागरिकांची मोठ्या प्रमाणात शहरात वर्दळ असते. मुंबई, घाटकोपर सारखी शिर्डी मध्ये त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आपण व्यक्तिगत वरील निवेदनांची गांभीर्याने दखल घ्यावी, तसेच शिर्डी नगरपरिषद शिर्डी पोलीस स्टेशन यांना फ्लेक्स बोर्ड तसेच विविध होर्डिंग लावू नये, याबाबतच्या सक्त सूचना द्याव्यात ठराव वावत त्वरित अंमलबजावणी व्हावी ही आपणास नम्म्र विनंती. अमृत गायके यांनी केली आहे