शिर्डी येथील हॉटेल टेम्पल ट्री मधून पळून गेलेले 2 संशयीत इसम हे काळ्यारंगाचे विना क्रमांकाचे महिंद्रा थार गाडीमधुन छत्रपती संभाजीनगर येथुन नेवाशाच्या दिशेने येत आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकाने तात्काळ खडका फाटा, ता. नेवासा येथील टोल नाका येथे जावुन सापळा रचुन थांबलेले असतांना थोडाच वेळात काळ्या रंगाची विना क्रमांकाची थार गाडी येताना पथकास दिसली.
पथकाने सदर गाडी थांबवण्याचा इशारा करताच संशयीतांनी ताब्यातील थार गाडी छत्रपती संभाजी नगरच्या दिशेने वळवुन पळुन जाण्याच्या तयारीत असतांना पथकाने त्यांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्याचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1) वसीम ताहीर शेख वय , रा. बिलोली, जिल्हा नांदेड व 2) फिरोज रफीक शेख वय 29 रा. सुतारगल्ली, बिलोली, जिल्हा नांदेड असे असल्याचे सांगितले.
ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांकडे त्यांनी हॉटेल टेम्पल ट्री, शिर्डी येथे हॉटेल मधील रुम बुक करण्यासाठी दिलेले बनावट आधारकार्डच्या 2 झेरॉक्स मिळुन आल्या. वरील दोन्ही इसमांकडे हॉटेल टेम्पल ट्री, शिर्डी येथे बनावट आधारकार्ड देवुन रुम बुक करुन राहण्याचे कारणाबाबत विचारपुस करता दोन्ही संशयीत हे बनावट सोने आणुन शिर्डी परिसरातील नागरीकांच्या ओळख करुन, नागरीकांचा विश्वास संपादन करुन त्यांचेकडे असलेले केमीकलचे आधारे बनावट सोने हे खरे असल्याचे भासवुन विक्री करणे करीता असल्याचे सांगितल्याने त्यांचेकडील बॅगची झडती घेतली असता त्यांचेकडे विविध प्रकारचे रसायनांच्या बाटल्या, मोबाईल फोन व महिंद्रा कंपनीची थार असा एकुण 13,35,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने आरोपींना ताब्यात घेवुन शिर्डी पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे.
पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशन करीत आहे.
शिर्डी या ठिकाणी बनावट आधारकार्ड देवुन संशयीतरित्या वास्तव्य करणारे आरोपींना खडका शिवार, ता. नेवासा येथुन अटक करण्यात आली असुन आरोपी हे दहशतवादी/हल्लेखोर नाहीत. आरोपी हे बनावट सोने खरे असल्याचे भासवुन विक्री करणे करीता आल्याचे निष्पन्न झाल्याने शिर्डी परिसरातील व जिल्ह्यातील नागरीकांनी अफवांवर विश्वास ठेवु नये असे अवाहन पोलीस अधीक्षक यांनी केले आहे.