कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कर्मवीर,नगर जवळ जुन्या भूमी अभिलेख कार्यालयाजवळ आयेशा कॉलनी येथील रहिवासी पूर्वी (महादेवनगर)सोयेल हरून पटेल (वय-२८) याचा प्रमुख आरोपीच्या पत्नीशी असलेल्या अनैतिक संबधाच्या संशयावरून आरोपी मच्छीन्द्र सोनवणे,स्वप्नील गायकवाड,महेश कट्टे,विकी परदेशी व त्याचा अनोळखी मित्र,योगेश जाधव उर्फ योग्या आदींनी चाकू,लाकडी दांडके,लोखंडी खिळे असलेला बांबू आदींच्या सहाय्याने जावेद समशेर शेख यांच्या प्लॉटमध्ये निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघड झाल्याने कोपरगाव शहर आणि तालुक्यात खळबळ उडाली आहे.यातील तीन आरोपी पोलिसांनी रात्रीच अटक केली असून अद्याप तीन आरोपी अद्याप फरार आहे.पोलीस त्यांचा शोध घेत आहे.
सदरच्या घटनेचे सविस्तर वृत्त असे की,”मयत तरुण सोहेल पटेल व प्रमुख आरोपी मच्छीन्द्र सोनवणे यांच्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा प्रमुख आरोपीस संशय होता.त्यावरून तो त्यांच्या मागावर होता.त्यातून ही गंभीर घटना घडली असल्याचे बोलले जात आहे.प्रमुख आरोपी मच्छीन्द्र सोनवणे यांने आपले सहकारी मित्र स्वप्नील गायकवाड,महेश कट्टे,विकी परदेशी व त्याचा अनोळखी मित्र,योगेश जाधव उर्फ योग्या आदींना एकत्र करत मयत सोहेल याचा काटा काढण्याचा निर्णय घेतला होता.त्यातून रविवारी रात्री ०८ वाजेच्या सुमारास प्रमुख आरोपी सोनवणे व अन्य एक यांनी त्यास आपल्या टाटा मॅजिक मध्ये (क्र.एम.एच.१५ ई ४७९५) घेऊन गोडगोड बोलून घेऊ गेले होते.तर अन्य दोन मागवून आपल्या दुचाकीवरून घटनास्थळी आला होता.या शिवाय आणखी एक जण घटनास्थळी नंतर आला होता.मात्र त्याचे नाव समजू शकले नाही.आदींनी एकत्र येऊन मयत सोहेल पटेल यास चाकू,लाकडी दांडके,लोखंडी खिळे असलेलालाकडी बांबू आदींनी कर्मवीर नगर मधील जावेद शेख यांच्या रिकाम्या प्लॉट मध्ये नेऊन त्याचा काटा काढला आहे.त्याच्यावर चाकूने जबर हल्ला चढवला होता.त्यात त्याचा मृत्यू झाला आहे.त्यास उपचारार्थ कोपरगाव नजीक जनार्दन स्वामी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले आहे.
दरम्यान घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी श्रीरामपूर येथील अतिरिक्त पोलीस अधीक्षक दत्तात्रय
बलमूर्गे,शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने,कोपरगाव तालुका पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख,पोलिस उप निरीक्षक रोहिदास ठोंबरे,आदींनी भेट दिली असून आतापर्यंत तीन आरोपी अटक असून अद्याप तीन आरोपी फरार आहेत.त्यांच्या अटकेसाठी पथके रवाना झाली असल्याची माहिती पोलिसांनी आंदोलकांना दिली आहे.
दरम्यान या गंभीर घटनेचे पडसाद कोपरगाव शहरात उमटले असून आजण सकाळी १०.३० वाजता एका समाजाच्या गटाने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यावर जमावाने अघोषित मोर्चा काढला होता.त्यात त्यांनी प्रमुख आरोपीसह अन्य आरोपींना तत्काळ अटक करा,आरोपीस फाशीची शिक्षा झाली पाहिजे.अशा मागण्या केल्या आहेत.यातील अद्याप अनेक आरोपी असून त्यांना पोलिसांनी जेरबंद करावे अशा मागण्या केल्या आहेत.
दरम्यान माहितगार सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आधी मयतास कलावती माता मंदिरासमोर शिवाजीनगर येथे आधी मारहाण केली नंतर कर्मवीनगर येथे सहा आरोपीनी खून केला आहे.या घटनेत आणखी एक साक्षीदार असून त्यास आरोपींनी मारण्याची धमकी दिली असल्याचा आरोप पोलीस ठाण्यात आंदोलकांनी केला आहे.
दरम्यान शहर पोलीस ठाण्यात कोपरगाव नगरपालिकेचे माजी नगरसेवक मेहमूद सय्यद यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.त्यात त्यांनी म्हटले आहे की,”या शहरात दोन नंबरचे गुन्हेगार पोलीस ठाणे चालवत आहे.”शहरातील काही लोक जातिवादावर पोलीस ठाण्याच्या समोर काही जण शिवीगाळ करतात पोलीस हाताची घडी तोंडावर बोट ठेवत असल्याचा आरोप केला आहे.गावाची शांतता बाधित करतात त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.हीच घटना विरुद्ध बाजूने झाली असती तर शहरात जाळपोळ झाली असती.या घटनेचा गंभीर तपास झाला पाहिजे.याचा अतिरेक झाला तर आमचे तरुण हत्यार उचलू शकतात” असा इशारा पोलीस अधिकाऱ्यासमोर दिला आहे.पण आम्ही असे करत नाही.”गो-मातेच्या नावावर अनेक गुन्हे दाखल होत आहेत.कायदा कडक करा,गुन्हेगार म्हणून आपण जरी समोर असेल तर माझेवर गुन्हे दाखल करा” असे आवाहन केले आहे.कोणी गांडू नाही,सगळ्यांच्या हातात जोर असल्याचा इशारा दिला आहे.एका इसमाने,”श्रीरामपूर येथून कोपरगाव शहरात येऊन ,”सागर बेग’ येथे दहशत करतो.त्याचा बंदोबत तुम्हाला होत नसेल तर आम्ही त्याचा बंदोबस्त करतो असा इशारा दिला आहे.
अस्लम शेख यांनी आरोपींना जामीन मिळायला नको असे आवाहन केले आहे.ज्यांच्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होत असेल त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हव,आम्हाला शांतता भंग करावयाची नाही,मात्र कोणी आम्हाला उकसावू नये” अशी मागणी केली आहे.
दरम्यान कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात श्रीरामपूर येथील अतिरिक्त पोलीस अधीक्षक दत्तात्रय बलमूर्गे यांनी आंदोलकांना शांत राहण्याचे आवाहन करताना,” या गुन्ह्यातील तीन आरोपी अटक केले असून बाकी तीन आरोपींना अटक करण्यास पोलीस पथके रवाना झाले आहे ते लवकरच त्यांना जेरबंद करतील असे आश्वासन उपस्थितांना दिले आहे.या गुन्ह्याचा तपास नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करणार आहे.आरोपींना शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले जातील.यातील प्रमुख आरोपी कोणी आहे का याचा तपास करणार आहे.आरोपी सुटतील अशी कोणतीही त्रुटी ठेवणार नाही.हा तपास निर्दोष असेल असे आश्वासन दिले आहे.त्यांनतर हा जमाव पांगण्यास मदत झाली आहे.यात मेहमूद सय्यद,अस्लम शेख,अकबर शेख आदींनी महत्वाची भूमिका बजावली असल्याचे दिसून आले आहे. या बैठकीनंतर काही आंदोलक पोलीस प्रवेशद्वाराजवळ बाहेर आले त्यांचे समाधान झालेले दिसले नाही.काहींनी पुन्हा एकदा पोलीस ठाण्याच्या द्वारात बसण्याचे बोलून दाखवत असल्याचे आढळून आले असल्याने कोपरगाव शहर काही दिवस अशांत राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने पोलिसांना डोळ्यात तेल घालून चोख बंदोबस्त ठेवावा लागणार आहे.पोलिसांनी रात्रीच अतिरिक्त पोलीस पथक शहरात तैनात केले असून शहरात तणावपूर्ण शांतता आहे.
दरम्यान मयत तरुण विवाहित असल्याची माहिती हाती आली असून त्याच्या पश्चात आई,वडील,पत्नी,एक मुलगा,(एक वर्ष),एक बहीण,असा परिवार आहे.त्याचेवडील रिक्षा चालक असल्याची माहिती हाती आली असून भाऊ तोच व्यवसाय करत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.