शिर्डी प्रतिनिधी शिर्डी येथील श्री साईनाथ हॉस्पिटल (२०० रूम) मध्ये कचरा कुंडीत नवजात शिशुचा मृत अर्भक आढळून आले आहे..
साईनाथ हॉस्पिटलच्या प्रसुती वार्डातील कचराकुंडीत हे मृत अर्भक आढळले असुन ते स्री जातीचे मृत अर्भक असल्याचे समजते रुग्णालयातील स्वच्छता कर्मचारी कचरा गोळा करण्यासाठी याठिकाणी गेले असता त्यांना हे मृत अर्भक दिसले..हे नवजात शिशु मृत्यू होण्याअगोदर पाच तासांपुर्वी जन्मलेले अर्भक असावे असे बोलले जात आहे या प्रकारानंतर हॉस्पिटल मधील कर्मचारी महिलेच्या फिर्यादीवरून अज्ञात गुन्हेगारा विरोधात शिर्डी पोलिस स्टेशनल गुन्हा दाखल करण्यात आला आहे..शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 432/2024 अन्वये भारतीय न्याय संहिता 94 नुसार गुन्हा दाखल करण्यात असुन या घटनेचा शिर्डी पोलिसांकडून तपास सुरू आहे याविषयी साईनाथ रुग्णालय प्रशासनाकडून माहिती घेतली असता साईनाथ हॉस्पिटलमध्ये नोंद असलेल्या रुग्णांपैकी ह्या शिशुच्या नोंदी पाहता हे शिशु हॉस्पिटलमधील नसल्याचे सांगण्यात आले आहे हे नवजात शिशु ह्या हॉस्पिटल मध्ये जन्माला आलेला नाही कोणीतरी बाहेरून आणून येथे टाकले आहे त्याची संपूर्ण सीसीटिव्ही फुटेज तपासण्याचे काम रात्री उशिरा पर्यंत सुरु होते परंतु हे नवजात शिशु कोणी टाकले हे आजून स्पष्ट झालेले नाही ह्या घटनेमुळे संस्थांनच्या हॉस्पिटलचे नाव मात्र बदनाम झाले असल्याची भावना लोकांनी प्रगट केली आहे पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशन करीत आहे