महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेतर्फे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
राहाता:
महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेच्या वतीने श्रीरामपूर येथील वॉर्ड क्रं.१ खबडी परिसरातील ख्रिश्चन कब्रस्तानमध्ये समता फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष शौकतभाई शेख यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी लोयोला धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरू रेव्ह. फादर प्रकाश भालेराव, डि पॉल शाळेचे व्यवस्थापक फादर फ्रॅंको,पास्टर विजय खाजेकर पास्टर अण्णासाहेब अमोलिक, एडवोकेट मंगला दुशिंग, माजी नगरसेवक प्रकाश ढोकणे, रवींद्र लोंढे, सुरेश ठुबे, निशिकांत पंडित, विशाल पंडित,प्रल्हाद अमोलिक,लेविन भोसले आदि प्रामुख्याने उपस्थित होते.
या प्रसंगी शौकतभाई शेख म्हणाले की, आजमितीस वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन ही काळाची नितांत गरज आहे, कोरोना काळात आपल्याला जो कटु प्रसंगाचा सामना करावा लागला तो प्रामुख्याने ऑक्सिजन च्या कमतरतेमुळे, तथा वृक्ष हे ऑक्सिजन निर्मितीचे काम करतात तसेच वृक्षांमुळे पाऊसही अधिक प्रमाणात पडतो,पावसामुळे सर्वत्र सुजलाम सुफलाम होते. याकरीता वृक्ष लागवड आणी वृक्ष संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी आहे असे समजून प्रत्येकाने वृक्ष लागवडी कामी पुढे येत वृक्ष संवर्धन ही मोठी चळवळ निर्माण झाली पाहिजे पाहिजे असे ते म्हणाले.तसेच यावेळी उपस्थित अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
पुढे बोलताना श्री.शेख म्हणाले की, महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेच्यावतीने आज होत असलेला वृक्षरोपणाचा कार्यक्रम खुपच स्तूतीजन्य आहे,कारण आपली जी काही आजची धन – संपदा प्रोपर्टीज आहे ती उद्या कदाचित नसणार मात्र आम्ही लावलेली झाडे (वृक्ष) ही आम्ही गेल्यानंतरही आमच्या येणाऱ्या भावी पिढीस खुपच फायद्याची तथा फलदायी ठरणार असल्याने आम्ही आज आहोत, उद्या राहू न राहू मात्र वृक्ष संवर्धनाच्या निमित्ताने येणाऱ्या भावी पिढीसाठी नक्कीच काहीतरी चांगलं सोडून जावू असेही ते म्हणाले.
यावेळी ख्रिस्ती विकास परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष मार्कस बोर्डे, संतोष दिवे, प्रमोद शिंदे,अंतोन दुशिंग, खंडागळे गुरुजी, प्रतिमा पंडित,जोसेफ खंडागळे आदि मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेचे विश्वस्त अविनाश काळे यांनी केले. कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन जिल्हाध्यक्ष दीपक कदम यांनी केले होते.शेवटी दिपक कदम यांनी आभार मानले.वृत्त विशेष सहयोग, पत्रकार दिपक कदम, श्रीरामपूर