कोपरगाव शहरातील कोर्टाच्या पाठीमागे असलेल्या हरिजन कॉलनी येथे घरफोडी झाली होती,,, तेथील राहणाऱ्या सौ. मालती रुपेश हाडा यांच्या घराची गुरुवार 25 जुलै रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने पाठीमागच्या साईडने असलेल्या दरवाज्याची कडी तोडून ,चोरट्याने किचन खाली ठेवलेल्या पेटीतून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम एकूण 9लाख 70 हाजार लंपास केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती यावर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तपासाची चक्री वेगाने फिरवून चोरी करणाऱ्या आरोपी शुभम केशव राखपसरे वय 24 राहणार गजानन नगर याला ताब्यात घेतले दरम्यान त्याला याबाबत विचारणा केली असता त्यांनी अगोदर उडवा उडवाउडवीची ची उत्तरे दिली मात्र पोलिसांनी त्याला पोलीसी खाक्या दाखवताच आरोपीने गुन्हा कबुल केला आहे. आरोपी कडून पोलिसांनी सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे ही यशस्वी कामगिरी पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पावरा,
पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे,
मयूर भामरे, बीएस कोरेकर, कुळधरण, तावरे, काकडे ,धोंगडे यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे 24 घंट्याचा आतच आरोपीला पकडण्यात यश आल्याने सर्व स्तरातून पोलिसांचे कौतुक होत आहे
जाहिरात