ना. विखेंच्या मतदारसंघात दूध दरवढी साठी शिवसैनिकांचे आंदोलन
खुद्द दुग्धविकास मंत्रांच्या मतदार संघात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे दुधाला भाव मिळावा यासाठी आंदोलन…
मंत्री विखे पाटीलच्या प्रतिकात्मक पुतळ्याला दुधानच अंघोळ घालत नोंदवला निषेध…
विखेपाटील यांच्या निषेधार्थ शिरडीत शिवसेना कार्यकर्त्यांच्या जोरदार घोषणाबाजी केलीय ..
शिर्डी विधानसभा मतदारसंघ संघाचे नेतृत्व करणार आणि महाराष्ट्र राज्याचे दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघातील शिर्डीत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने शिर्डी नगरपरिषद समोर आंदोलन केलंय..दुधाला ४० रुपये भाव मिळावा यासाठी शेतकरी सह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केलेय,चक्क मंत्री विखेपाटील यांच्या यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला दुधाने आंघोळ घालून आंदोलन करत तीव्र संताप व्यक्त केलाय… जर भाव मिळाला नाही तर पुढे यापेक्षा मोठं आंदोलन केलंय जाईल असा इशारा व्यक्त केलाय ह्यावेळी शिवसेनेचे जेष्ठनेते सुहास वहाडने नाना बावके तालुकाध्यक्ष संजय शिंदे शहरप्रमुख सचिन कोते सह तालुक्यातील शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्तिथ होते