शिर्डी प्रतिनिधी
परवा शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या आदेशाने शिर्डीसह अनेक ठिकाणी अवैद्य व्यवसायावर धाडी टाकण्यात आल्या व गोपनीय माहिती मिळताच सावळीविहीर येथील दारू तस्कर दिलीप अण्णा नामक व्यक्तीची बेकायदेशीर दारू त्याच्या वेगणणार गाडीत शिर्डी कडे येत असल्याचे समजताच ती गाडी तात्काळ शिर्डी पोलीसांनी ताब्यात घेतली त्यात जवळजवळ एक लाखची दारू सह एकूण तीन लाखाचे मुद्देमाल जप्त करून त्यावर 65 इ प्रमाणे दिलीप अण्णांच्या पंटर वर गुन्हा दाखल करण्यात आला यात खरेतर शिर्डी पोलिसांनी खऱ्या मालकावर गुन्हा दाखल केला पाहिजे होता अशी नागरिकांची मागणी होती आणि मूळ मालक अण्णा हा राजरोसपने दारूचा व्यवसाय अनेक वर्षांपासून करतो त्यावर दारूबंदी विभाचे वरदहस्त असल्याचे सांगण्यात येते तसें बघितले तर दारूबंदी विभागानेच ही कारवाई करायला हवी होती परंतु त्या अण्णाचे लागेबंधे असल्याने दारूबंदी विभाग ह्याकडे आर्थिकपूर्ण दुर्लक्ष करीत असल्याचा सुद्धा आरोप होत आहे शिर्डी पोलिसांनी ह्या मालक अन्नावर गुन्हा दाखल केला पाहिजे होता आणि 93 प्रमाणे प्रस्ताव पाठवले पाहिजे होते म्हणजे त्यावर कडक कारवाई झाली असती आणि त्याने दारू तस्करी बंद केली असती अशी परिसरात जोरदार चर्चा सुरु आहे
जाहिरात