तलाठी भरती प्रक्रियेत झालेल्या गैरप्रकाराचा गोपनीय अहवाल आपल्याच अखत्यारीत येणाऱ्या जिल्हाधिकारी महोदयांनी राज्याच्या अपर मुख्य सचिवांना याच वर्षी फेब्रुवारीत पाठविला आहे. आपण त्यावर काय कार्यवाही केली, हे जनतेला आणि विद्यार्थ्यांना सांगा, असे थोरात म्हणाले.महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तुम्ही राजकारणातून संन्यास घ्या, असे मी म्हणणार नाही. मात्र सत्य लपवले तरी बदलणार नाही.
तलाठी भरती प्रक्रियेत झालेल्या गैरप्रकाराचा गोपनीय अहवाल आपल्याच अखत्यारीत येणाऱ्या जिल्हाधिकारी महोदयांनी राज्याच्या अपर मुख्य सचिवांना याच वर्षी फेब्रुवारीत पाठविला आहे. आपण त्यावर काय कार्यवाही केली, हे सुद्धा जनतेला आणि विद्यार्थ्यांना सांगावे. या शिवाय तलाठी भरतीमध्ये झालेल्या गैरप्रकारांचे अजूनही ढीगभर प्रकरणे आहेत, जी समोर आणली तर तुमचा ‘पारदर्शक कारभार’ उघडा पडेल.
तलाठी भरतीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केला होता. याबाबत उत्तर देताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्ह्यातल्या दोन महाभागांनी आरोप केले, असे म्हणत पवार-थोरातांवर निशाणा साधला होता. विखेंच्या याच टीकेला थोरात यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.