शिर्डी प्रतिनिधी/ शिर्डी लगत असलेल्या निमगाव शिवारात ४ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास दरोडा पडल्याने परिसरात घाबराटीचे वातावरण पसरले आहे ह्याबाबत प्रविण गोरक्षनाथ आहेर वय ३२ वर्षे, धंदा शेती रा. निमगाव निमशेवाडी ता. राहाता
समक्ष पोलीस स्टेशनला हजर होवून लेखी फियांद दिली आहे की,
मी वरील ठिकाणी मी कुंटबासह राहतो शुक्रवारी रात्री १०,वाजता आम्ही घरातील सर्वजण जेवण झाल्यानंतर मी तसचे नाझी पत्नी व लहान मुलगा आदित्य असे आम्ही समोरील रुममध्ये झोपी गेलो तसेच माझे आई-वडिल व माझा मोठा मुलगा श्रेयस असे आमचे शेजारील रुममध्ये झोपले व माझी आजी देऊबाई हि देखील किचनमध्ये जावुन झोपली. त्यानंतर ४तारखेला रोजी रात्री रात्री १वाजता माझी आजी वॉशरुमला जावुन आली व दरवाजा बंद न करताच ती किचनमध्ये जावून झोपली, पहाटे ३,१५ वा. चे सुमारास माझी आजी देऊबाई हि पुन्हा वॉशरुमला जाण्याकरीता उठली असता तिने पाहिले कि हॉलमध्ये सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले होते, तेव्हा तिने मला व घरातील इतर लोकांना उठविले तेव्हा आम्ही पाहिले कि, हॉलमध्ये सर्व सामान पडलेले होते, तसेच किचन शेजारील रुममधील कपाट हे देखील उघडे होते तेव्हा आम्ही कपाटात पाहिले असता कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम आम्हाला मिळून आले नाही.
तेव्हा माझी खात्री झाली कि कोणीतरी अज्ञात चोरट्याने उघड्या घरातुन रोख रक्कम
सोन्याचे दागिने चोरून नेले आहे. त्यात ५ग्रम वजनाचे झुबे किमत दहा हजार , दहा ग्रॅम वजनाचे मंगळसुत्र सरकारी किमत दहा हजार , १५ ग्रॅम वजनाचे मंगळसुत्र किमत १५हजार तसेच ५०हजार रुपये रोख
येणे प्रमाणे वरिल वर्णनाचे व किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चार ऑगस्ट रोजी रात्री कोणीतरी अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करुन माझे घरातील कपाटातुन रोख रक्कम व वरील वर्णनाचे व किंमतीचे सोन्याचे दागिने असे माझे संमतीशिवाय, लबाडीच्या इराद्याने, स्वताच्या अर्थिक फायद्यासाठी चोरून नेले आहे. म्हणून माझी अज्ञात चोरट्यां विरुध्द कायदेशीर फिर्याद दिली असुन शिर्डी पोलीसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून आधिक तपास पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार करीत आहे