शिर्डी प्रतिनिधी/ प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व) वी-२, ३ रा मजला, वडाळा ट्रक टर्मिनल, बडाळा, मुंबई (पूर्व
कार्यालयीन आदेश क्र. प्रापका/खटला/मुं(पूर्व) २०२४/जाक्र. ६४२९ ६/८२४ , २०७४ संदर्भ: श्री. विकी कुंडलिक जाधव, पत्रकार यांनी कार्यालयास दि.१६जुलै २०२४ रोजीचा ई-मेल द्वारे पोलीस कर्मचारी आधिकारी आपल्या वाहनावर पोलीस महाराष्ट्र शासन असा मजकूर लिहीत असल्या बाबत तक्रार केली होती त्या तक्रारींची गंभीर दखल घेऊन तात्काळ
कार्यालयीन आदेश काढण्यात आला त्यात उपरोक्त संदभांकित विषयानुसार, विकी कुंडलिक जाधव, पत्रकार यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यातील पोलिस अधिकारी / कर्मचारी खाजगी वाहनांवर पोलिस बोध चिन्ह तसेच पोलिस लिहणा-या वाहनांवर कारवाई करणे बाबत तक्रारीचा ई-मेल प्राप्त आहे.
त्या अनुषंगाने या कार्यालयातील सर्व कार्यरत वायूवेग पथकांमधील मधील मोटार वाहन निरीक्षक सहा, मोटार वाहन निरीक्षक २ यांना आदेशित करण्यात येते की, आपल्या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात तपासणी दरम्यान खाजगी वाहनांवर “पोलिस बोध चिन्ह तसेच पोलिस लिहणा-या वाहनांना तसेच वाहनांत महाराष्ट्र शासन अशी पाटी किवा बोध चिन्हांचा वापर वाहनमालक त्यांच्या वाहनांवर करीत असल्याचे वाहन तपासणीमध्ये निदर्शनाम आल्यास दोषी वाहनांवर मोटार वाहन अधिनियम, १९८८ व तद्नुषंगीक नियमांतील तरतूदीनुसार काटेकोरपणे कारवाई करावी व केलेल्या कार्यवाहोचा अहवाल खटला विभागात न चुकता सादर करण्यात यावा. असा लेखी आदेश सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी स अ गिरी यांनी दिल्यामुळे पोलीस कर्मचारी व आधिकारी व जे लोकसेवक आहे जे आपल्या वाहनावर परवानगी नसताना ही व माहिती असताना देखील महाराष्ट्र शासन लिहीतात अशा लोकसेवका मध्ये मोठी खळबळ उडाली आहे कार्यालयातील सर्व कार्यरत वायुवेग पथकांतील मोटार वाहन निरीक्षक सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक याना कारवाई बाबत लेखी आदेश दिले आहे
जाहिरात