शिर्डी प्रतिनिधी/ सकल मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवार दिनांक १३ ऑगस्ट रोजी शिर्डीत श्री साईबाबांच्या समाधी मंदिरात जाऊन साईबाबांचे दर्शन घेतले त्याचा साईबाबा संस्थान तर्फे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला . तत्पूर्वी काल मनोज जरांगे पाटील यांचे रात्री अहिल्यानगर येथून शिर्डीला आगमन होताच साईंच्या नगरीत त्यांचे अभूतपूर्व स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतष बाजी, एक मराठा लाख मराठा, मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या व मनोज जरांगे पाटील यांची कारमधून भव्य अशी शहरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली हजारो कार्यकर्ते सामील झाले होते.शिर्डी करांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला पत्रकार परिषदेत बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले मराठा आरक्षण मिळावे व ते जाहीर करावे यासाठी साईबाबानी त्यांना सुबुद्धी द्यावी असे साकडे साईबाबाना घातल्याचे सांगितले
साईबाबानी श्रध्दा सबुरीचा मत्र दिला आहे असे असले तरी एक वर्ष झाले अजुनही सरकार निर्णय घेत नाही महाराष्ट्रातील शेतकरी गोर गरिब सामान्य माणूस मोठा अडचणी मध्ये आहे त्याच्या वेदना या सरकारला समजत नाही या सरकारने आम्हाला झुलवत ठेवले आहे सामान्य माणसाच्या भावना व वेदना या शासनाला समजत नाही काही जण नको ते बोलत आहे त्याचा बोलवता धनी वेगळाच आहे काहीना आमदारकीचे वेध लागले आहे असे सांगताना २९तारखे नतर सबुरी पकडली आहे त्या नतर बघु असे स्पष्ट केले यावेळी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते हजर होते
जाहिरात