कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहिवासी असलेल्या व एकाच कुटुंबात राहत असलेल्या महिलेच्या अविवाहित दिराने घरात कोणी नाही ही संधी साधत काल रात्री अकरा वाजेच्या सुमारास संरक्षण भिंतीच्या आत उभी असलेल्या आपल्या भावजयीचा विनयभंग केला असून या प्रकरणी कोणास काही सांगितले तर मुलीवर बलात्कार करण्याची धमकी दिली असल्याने सदर महिलेने (वय -35) आपल्या दिराचे विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे कोपरगाव शहरात खळबळ उडाली आहे.
विवाह हा आयुष्यातला एक कसोटीचा व अत्यानंदाचा अनुभव असतो.विवाह जुळविण्यात कसोटी असते,तर तो संपन्न करण्यात आनंद असतो.सावधानपणे व चाणाक्षपणेच कसोटीला उतरता येते व तसे उतरता आले नाही,तर आयुष्यभर पश्चात्ताप करीत बसावे लागते आणि विवाह समाधानकारकरीत्या संपन्न झाला नाही,तर आयुष्यभर आनंदाला मुकावे लागते.सामंजस्य दाखविले,तरच हरवलेला आनंद पुन्हा मिळविता येतो.पूर्वी अल्पवयातच लग्ने जुळायची व होऊनही जायची.त्यात वडीलधाऱ्यांचीच मुख्य भूमिका असायची.ते सांगतील ते व करतील ते निमूटपणे मानले जायचे.लग्नापूर्वी मुलामुलींना एकमेकांना भेटायला व बोलायलाच प्रतिबंध होता.लग्न-विधीतच एकमेकांना बोलायला व भेटायला नाही,पण पाहायला मात्र मिळायचे व समाधान किंवा असमाधान व्हायचे.पण ते पत्करावेच लागायचे.त्याला दुसरा पर्यायच उपलब्ध नसायचा.ही जन्मगाठ स्वर्गातच बांधली गेली आहे.असे मानून निमूटपणे मान्य करावे लागायचे.आता मात्र परिस्थिती आमूलाग्र बदलली आहे.वय झाल्यावरच काय,पण त्याहूनही उशिरा लग्ने जुळतात व लागतात.यात वडीलधाऱ्यांची मर्जी संपादित केली जातेच असे नाही.जोडीदार निवडताना रंग,रूप,वय,शिक्षण,कर्तबगारी,कुल-शील घराणे,स्वभाव,गुणसंपन्नता,निव्र्यसनता आदी अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो व त्यात तारताम्यताही बाळगावी लागते.आपले स्वत:चे रंग,रूप,वय,शिक्षण,कर्तबगारी,कुल-शील घराणे, स्वभाव,गुणसंपन्नता,निव्र्यसनताआदी गुणही लक्षात घ्यावे लागतात व आपली अनुरूपताही शोधावी लागते.सम-समान संयोगच यशस्वी व सुखदायी ठरतो.म्हणून अवास्तवतेला सोडचिठ्ठी देऊन वास्तवतेच्या आधारावरच या बाबतीत उद्भवणाऱ्या समस्यांचे निराकरण करावे लागते.वर्तमानात मुलींची संख्या कमी तर मुलांची जास्तीची झाल्याने या स्थितीत विवाह जुळविणे ही मोठी गंभीर समस्या निर्माण झाली आहे.त्यामुळे अनेक चाळिशी ओलांडूनही तरुण अविवाहित राहत असून त्यांची मोठी सामाजिक चिंता निर्माण झाली आहे.त्यातून अनेक समस्या निर्माण होत आहे.त्यामुळे कुटुंब स्वास्थ्य बिघडले असून अविवाहित तरुण डोक्याला ताप ठरत असून असून अशीच घटना कोपरगाव शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असून यातील आरोपी व त्याचा मोठा भाऊ असे दोघांचे कुटुंब आहे.अर्थातच ते कुटुंब परप्रांतीय असून ते व्यवसायानिमित्त कोपरगाव शहरात स्थिरावले आहे.त्यातील एका मोठ्या भावाचे लग्न झाले असून एकाचे मात्र तो व्यवसाय करत नाही व व्यसनात गर्क असल्याने त्याचे लग्न जमण्यात नाना अडचणी येत आहे.अशातच तो उपवर झाल्याने घरातील लोकांना त्याची चिंता असताना शोध घेऊनही वधु न मिळाल्याने त्याने घरात कोणी नाही ही संधी साधत काल रात्री अकरा वाजेच्या सुमारास आपल्या मोठया भावजयी ही संरक्षण भिंतीच्या आत उभी असताना तो फिर्यादीनुसार अंगावर आला व फिर्यादीस समोरून मिठी मारून तिचा विनयभंग केला आहे.व वाईट साईट शिविगाळ करत सदर घटना कोणाला सांगितल्यास फिर्यादीत मुलीवर बलात्कार करण्याची धमकी दिली आहे.
दरम्यान सदर घटना फिर्यादी महिलेने आपला पती घरी आल्यावर त्यास सांगितली होती त्यानंतर त्यांनी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन आरोपी दिर याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान घटनास्थळी कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांचेसह व सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा,पो.हे.कॉ . डी.आर.तिकोने आदींनी भेट दिली यांनी आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.को.तीकोने हे करीत आहेत.
दरम्यान या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.345/2024 भारतीय दंड संहिता सन-2023 चे कलम 74,352,351(3) प्रमाणे आरोपी दिराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांचेसह व पो.उपनिरीक्षक महेश कुसारे यांनी भेट दिली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस पोलीस उपनिरीक्षक कूसारे हे करीत आहेत.