श्री साईबाबा सतत भक्तांसाठी धावून येतात, याचा प्रत्यय नित्य येत असतो. काही दिवसांपूर्वी संरक्षण विभागाचे सुरक्षा निरीक्षक श्री. विजय गुढगे यांना द्वारावती भक्तनिवास परिसरात एक पॅशन प्रो मोटर सायकल बेवारस आढळून आली होती. त्यांनी संरक्षण कार्यालय ला माहिती दिली. त्यांनी काल गाडी मधील draft बॉक्स उघडून पहिला असता, श्री साईबाबांची प्रतिमा असलेल्या रुमालात कागदपत्र गाडीचे आढळून आले. श्री गुढगे यांनी कागदपत्र तपासला असता, त्यात त्यांना गाडीच्या मालकाचा नंबर मिळाला. आज मोटर सायकल चे मालक श्री. अमित रमेश दुबे, मूळ रा. गोरखपूर, सध्या रा. वाघोली पुणे हे आले. त्यावेळी त्यांनी सांगितले कि, मी साईबाबांचा निस्सीम भक्त आहे. मी पेंटिंग ची कामे करतो. माझ्या मोटर सायकल मधील गाडीची कागदपत्र साईबाबांची प्रतिमा असलेले कापडात गुंडाळून ठेवले होते. वाघोली पुणे येथून माझ्या घरासमोरून गाडी चोरी झाल्यापासून मी खूप परेशान होतो. पोलीस स्टेशन ला तक्रार करायला गेलो तर, गाडीचे कागदपत्र नसल्यामुळे केस झाली नाही. मी बाबांना दररोज प्रार्थना करायचो कि, मला गाडी मिळावी. माझी नवीन गाडी घेण्याची ऐपत नाही. जेव्हा काल मला शिर्डी साईबाबा मंदिराचे security कर्मचारी यांचा गाडी सापडली असा फोन आला, तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रू आले. वाघोली येथून चोरी झालेली गाडी माझे श्रद्धास्थान असलेले साईबाबांच्या पावन भूमीत सापडली. ऑफिस ला आल्यावर त्यांनि सुरक्षा अधिकारी श्री गुडघे यांचे मनस्वी आभार मानून, श्री साईबाबा संस्थान चे सुरक्षा विभागाचे कौतुक केले.
जाहिरात