स्वतःच्या वडिलांचा पुतळाही सरकारी खर्चाने बनवणार आहे, अशा शब्दात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवणारे भाजप नेते आणि खासदार नारायण राणे यांना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी चांगलंच सुनावलं आहे. बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राचे बाप आहेत,
असं राऊतांनी राणेंना ठणकावून सांगितलं. मालवण किल्ल्यावर ठाकरे गट आणि राणे समर्थकांमध्ये झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर राऊत बोलत होते “नारायण राणे हे इतके नमक हरामी करतील असं वाटलं नव्हतं. बाळासाहेब ठाकरे हे अख्ख्या महाराष्ट्राचे बाप आहेत. ज्यांनी तुम्हाला मुख्यमंत्री केलं, मंत्री केलं, पदं दिली, ज्याने तुम्हाला अन्नाला लावलं,
ज्यांनी तुम्हाला प्रतिष्ठा दिली, ज्यांनी महाराष्ट्राला अस्मिता दिली, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर ज्यांनी महाराष्ट्राला लढायला शिकवलं, त्यांच्याबद्दल आपण प्रश्न विचारताय? असं असेल तर महाविकास आघाडी जे जोडेमारो आंदोलन करणार आहे, ते योग्यच आहे” असं संजय राऊत म्हणाले.मालवणमधील गुंडांनी काल पोलिसांना शिव्या दिल्या, त्यांच्यावर थुंकले, फक्त वर्दीवर हात टाकायचाच बाकी होता. एवढे सगळे होऊनही गृहमंत्री नारायण राणे यांची बाजू घेत होते.
त्यांच्या बोलण्याची स्टाईलच आक्रमक आहे, असे ते सांगत होते. मग आमच्याही बोलण्याची स्टाईल आहे, आमच्यावर का गुन्हे दाखल करता? असा सवाल राऊत यांनी विचारला. तसेच पक्षातील लोक पोलिसांना धक्काबुक्की करतायेत, शिव्या घालतायेत यावर गृहमंत्री काय करतायेत? असा खडा सवालही त्यांनी विचारला. वर्दीचा सन्मान करता येत नसेल तर गृहमंत्री फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, असा सल्लाही राऊत यांनी दिला.
दीपक केसरकर यांना बुटाने मारले पाहिजे. केसरकर हे अफजलनाखानाची औलाद आहेत. असली सडक्या विचाराची माणसे आमच्यातून निघून गेली, हे बरेच झाले, अशा शब्दांता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्यावर टीका केली.