राहाता : आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खा. डॉ. श्रीकांत शिंदे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेना (शिंदे गट) च्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी शनिवार दि. ३१ ऑगस्ट रोजी शिव संवाद अभियाना अंतर्गत चर्चा करून शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत.
या शिव संवाद दौऱ्या प्रसंगी उत्तर अहमदनगर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कमलाकर कोते व नितीन औताडे यांनी केले आहे
खा. डॉ श्रीकांत शिंदे यांच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिव संवाद दौऱ्या संदर्भात माहिती देताना जिल्हाप्रमुख कमलाकर कोते व नितीन औताडे यांनी सांगितले की शनिवार दि. ३१ ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ वाजता
खा. डॉ.श्रीकांत शिंदे यांचा शिव संवाद दौरा शिर्डी शहरातील एका तारांकित हॉटेल मध्ये सुरू होणार आहे या संवाद दौऱ्यात शिर्डी लोकसभा मतदारसंघातील श्रीरामपूर, नेवासा, शिर्डी, कोपरगाव, संगमनेर, अकोले व राहुरी या विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत प्रारंभी सर्व मतदार संघातून आलेले पदाधिकारी व कार्यकर्त्यांची एकत्रित बैठक घेऊन त्यांच्याशी खा. डॉ शिंदे संवाद साधणार असून
त्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. विधानसभा मतदार संघ निहाय पदाधिकाऱ्यांच्या बैठकी घेऊन त्यांच्येशी संवाद साधणार आहेत जिल्हा संपर्कप्रमुख, जिल्हा सह संपर्कप्रमुख, लोकसभा संपर्कप्रमुखां सह संपर्कप्रमुख, लोकसभा निरीक्षक विधानसभा प्रभारी व निरीक्षक महिला युवा जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, जिल्हा संघटक, तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुख, शहर प्रमुख, महानगर प्रमुख, जिल्हा परिषद सदस्य,
नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, महिला आघाडी, युवा सेना व सर्व अंगीकृत संघटनांचे जिल्हा व तालुका स्तरावरील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत पदाधिकारी व कार्यकर्त्यांची एकत्रित बैठक संपल्यानंतर खा. डॉ श्रीकांत शिंदे विधानसभा मतदारसंघ निहाय उपस्थित पदाधिकाऱ्यांशी स्वतंत्रपणे संवाद साधणार आहेत आगामी विधानसभा निवडणुकीचे पार्श्वभूमीवर या शिव संवाद दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून
या शिव संवाद दौऱ्यामुळे शिवसैनिकांमध्ये अधिक ऊर्जा निर्माण होणार आहे खा. डॉ. श्रीकांत शिंदे उपस्थित पदाधिकारी कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करणार आहेत या शिव संवाद कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाप्रमुख कमलाकर कोते व नितीन औताडे यांनी केले आहे