शिर्डी प्रतिनिधी
शिर्डी मतदार संघातील रुई या गावात विखेंच्या गुंडांनी मारुती मंदिरा समोर माझ्या अंगावर धावुन येवुन मला जीवे मारण्याची धमकी दिली.
हे सर्व मंत्री राधाकृष्ण विखे व त्यांचे पुत्र सुजय विखे हे घडवुन आणत आहेत परंतु आम्ही अशा धमक्यांना भीक घालणार नाहीत.अशी माहिती भाजपा नेते डॉ.राजेंद्र पिपाडा यांनी दिली.
मी दि.14/09/2024 रोजी रुई या गावात वेगवेगळ्या मंडळाच्या गणपतीच्या आरतीसाठी गेलो होतो. या वेळी रुई गावातील मारुती मंदिरात दर्शनासाठी जात असताना त्या ठिकाणी काही लोक भेटले असता त्यांच्याशी गप्पा मारत असताना त्याठिकाणी विखेंचे गुंड माझ्यावर धावुन आले मला आर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली
व जीवे मारण्याची धमकी दिली. आम्ही विखेंचे लोक असुन आमच्या गावात तुम्ही यायचे नाही याचे परिणाम वाईट होतील अशी धमकी दिली. वरील सर्व प्रकार पहाण्यासाठी त्याठिकाणी गावक-यांची मोठी गर्दी जमली होती त्यांनी मध्यस्थी करुन त्यांना बाजुला केले.
उपस्थित लोकांना घडलेला प्रकार अजिबात आवडला नाही.भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी व्यक्तीस्वातंत्र्यातुन सर्वांना अधिकार दिलेले आहे. कोणी कोणत्याही गावात जावु शकतो आपले मत मांडु शकतो. परंतु विखे हे त्यांच्या कार्यकर्त्यांना चिथावणी देतात व त्यांच्या विरोधात बोलणा-यांवर हल्ला कऱतात.
विखेंच्या हुकुमशाही व गुंडशाहीला आम्ही कधी घाबरलो नाही व घाबरणारही नाही. आमच्याशिवाय मतदारसंघात दुसरे कोणीच फिरु नये लोकांना भेटु नये,लोकांच्या समस्या सोडवु नये अशी विखेंची भूमिका आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनाही आम्ही झालेला प्रकार सांगणार आहोत तसेंच विखें पितापुत्र खालच्या पातळीवर जावुन राजकारण करीत असुन त्यांच्या लोणी जवळील चंद्रपुर या गावात आमच्यावर त्यांच्या गुंडांमार्फत हल्ला करण्याचा प्रयत्न केला असल्याचे कळविले होते.
याबाबत आम्ही रितसर जिल्हा पोलिस अधिक्षक यांना पत्राद्वारे कळविले होते. हे सर्व प्रकार विखे पितापुत्रच करत असतात यासंदर्भात आम्ही नेहमी बोलत आलो आहोत.
झालेल्या घटनेची शिर्डी पोलिस स्टेशन येथे 650/2024 कलम 352,351 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. विखेंनी आपल्या गुंडांमार्फत विरोधकांवर असे भ्याड हल्ले कऱणे बंद करावे. असे भाजपाचे जेष्ठनेते राजेंद्र पिपाडा यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.