अ.नगर – सात ते आठ दिवसापूर्वी सारसनगर राजश्री हाऊसिंग सोसायटी या परिसरात खुनी आरोपी पहाटे 6:30 पासून विविध प्रकारच्या हत्यारे घेऊन व दारू च्या नशेत सारस नगर मधील नागरिकांना विविध स्वरूपाचे धमक्या देऊन मारून टाकण्याच्या धमक्या देत मृत मिसाळ यांना चाकू चे वार करून त्यांची हत्या केली.
या घटनेनंतर सारस नगर मधील रहिवासी अशोक घोलप व त्याचे कुटुंबीय जामीनावर सुटल्यास पुन्हा काही व्यक्तींना नावानिशी धमक्यात देत आहे. या त्याच्या पोलिसांच्या ताब्यात असताना धमक्यांमुळे ,मृत व्यक्तीचे कुटुंबीय व याआधी परिसरातील नागरिकांना दिलेल्या धमक्या मुळे रहिवाशांना भिती वाटत आहे.
जर घोलप कुटुंबीयांचे जामीन झाल्यास पुन्हा सर्व रहिवाशांच्या जीविकास धोका निर्माण होऊ शकतो. या भिती च्या छायेखाली नागरिक भयभीत आहेत.उदया विद्यार्थ्यांना व नागरिकांना नोकरी च्या ठिकाणी हे कुटुबीय जिवीतास धोका करू शकते तरी कायद्याने या सर्व बाबींचा अभ्यास करून योग्य तो न्याय द्यावा अशी अपेक्षा नागरिकांतून केली जात आहे.