डॉ. सुजय विखे यांनी शिंगवे-पिंपळवाडी शिव रस्ता म्हसोबा मंदिरापर्यंत रस्ता मुरुमीकरण कामाची पहाणी केली व नंतर त्यांनी संतोष गोंदकर यांचे साईसखा उद्योग समूहाच्या विविध उपक्रमांना भेट देत पहाणी केली.
डॉ. सुजय विखे यांच्या प्रयत्नातून शिंगवे पिंपळवाडी शिव रस्ता म्हसोबा मंदिरापर्यंत रस्ता मुरुमीकरण कामाची पहाणी केली. साईसखाने उभारलेले प्रकल्प जनतेच्या सेवेत प्रेरणादायी ठरतील व शिंगवे पिंपळवाडी परिसरातील जनतेला पिण्याचे स्वच्छ पाणी देऊन आरोग्यासाठी हातभार लागणार असल्याचे यावेळी सांगितले.
साईसखा उद्योग समूहाचे अध्यक्ष संतोष कोंडाजी गोंदकर, स्वातीताई संतोष गोंदकर, तानाजी गोंदकर, कांचनताई गोंदकर, सोनालीताई सालपुरे, सुनीताताई गोंदकर, तन्मय गोंदकर, सार्थक गोंदकर, सुदर्शन गोंदकर यांच्या परिवाराच्यावतीने डॉ. सुजय विखे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, पंचायत समितीचे माजी उपसभापती दीपक तुरकणे,
माजी उपनगराध्यक्ष अभय शेळके, महेंद्र शेळके, सुजित गोंदकर, तुषार गोंदकर, नितीन गोंदकर, अॅड. विलास आसने, प्रमोद गोंदकर, संदीप गाढवे, शंकरराव शेरकर, भिमाशंकर लोखंडे, अर्चना शेखर गाढवे, रामनाथ तुरकणे, विक्रम तुरकणे, जालिंदर तुरकणे, सतीश तुरकणे, दिनेश तुरकणे, रमेश सालपुरे, रविंद्र सालपुरे, दिगंबर सालपुरे, रविंद्र तुरकणे, पप्पू सालपुरे, बाळासाहेब बाभुळके आदी उपस्थित होते.