प्रस्थापितांमुळे काम कसे करता येत नाही, याची तक्रार थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे केल्याचंही सदाशिव लोखंडे यांनी सांगितलं. यावर मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांच्या पाठिशी उभे राहत नसल्याची खंतही सदाशिव लोखंडे यांनी व्यक्त केली.माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी शिर्डी राखीव मतदार संघ आहे.
या तालुक्यात प्रस्थापित नेत्यांना विचारल्याशिवाय काहीही काम करता आले नाही, असे सांगत, ही खंत मुख्यमंत्र्याना बोलून दाखवली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांशी संबंध व्यवस्थित ठेवा, असा सल्ला दिला. यावर आपण एका हाताने टाळी वाजत नाही, असे सांगून त्यांनीही आमच्याशी जुळवून घेतले पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांना सांगितलं.
श्रीरामपूर जिल्हा होण्याची मागणी लावून धरणार आहे. तसंच मुळा-प्रवरा वीज संस्था पुन्हा चालू करू. 2005 चा समन्यायी पाणीवाटप हा काळा कायदा पारित झाला, त्यावेळी या परिसरातील नेते विधानसभेत झोपले होते का?’, असा सवालही सदाशिव लोखंडे यांनी केला.