श्री साईबाबा व श्री साईबाबा संस्थानबद्दल चुकीची माहिती आणि अपप्रचार पसरवणाऱ्या व्यक्तीविरुद्ध श्री साईबाबा संस्थानच्या वतीने संरक्षण अधिकारी रोहिदास माळी यांनी गुन्हा दाखल केला असून त्याची प्रत सोबत जोडली आहे.
जाहिरात
श्री साईबाबा आणि संस्थानबद्दल खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती यापुढे सोशल मीडियाच्या विविध माध्यमांद्वारे प्रसारित करून, संस्थानच्या प्रतिमेला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्या विरूद्ध कठोर कार्यवाही करण्यात येईल असे संस्थान प्रशासनाच्या वतीने नमूद करण्यात आले आहे.