पुण्यामध्ये पोलिसांच्या हाती मोठं घबाड लागलं आहे. पुण्यातील सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांना नाकाबंदीदरम्यानत तब्बल 138 कोटींचं सोनं सापडलं आहे.
आज सकाळी केलेल्या कारवाई एवढ्या मोठ्या प्रमाणात सोनं जपत् करण्यात आलं आहे.
पुण्यातील सहकार नगर येथे पोलिसांनी एमएच 02 ईआर 8112 या कंटेनरला तपासणीसाठी थांबवलं. तपासणीदरम्यान या पांढऱ्या रंगाच्या कंटेनरमध्ये मोठ्या प्रमाणात सोनं असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. या कंटेनरमधील सोन्याची एकूण किंमत 138 कोटी रुपये इतकी असल्याची माहिती समोर आली आहे.
नियमित नाकाबंदीदरम्यान सदर सोन्याचा कंटेनर थांबवून तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान पोलिसांनी या सोन्याच्या वाहतुकीचा परवाना मागितला असता चालकाकडे आणि त्याच्यासोबत असलेल्या व्यक्तीकडे रितसर कागदपत्रं होती.
हे एवढं सोन डिलिव्हरी ट्रान्सपोर्टचे होते अशी माहिती पोलीस तपासामध्ये समोर आली आहे. या सोन्याच्या वाहतुकीचा कायदेशीर परवाना संबंधित वाहन चालकाकडे असल्याचं स्पष्ट झाल्याने पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही.