मी काय वाईट करत होते? मी माझ्या वडिलांसाठी मैदानात होते. माझ्या वडिलांसाठी युवा संवाद यात्रेत फिरण्याचं काम करत होते, प्रत्येक माणसाला भेटण्याचं काम मी करत होते. असं काय वाईट केलं होतं, की माझ्याबद्दल एवढं वाईट बोललं पाहिजे?” अशी नाराजी व्यक्त करत जयश्रीताई यांनी सवाल केला.
”जे वक्तव्य करण्यात आलं ते त्यांच्या वयाला शोभणारं आहे का? तुम्ही त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहात. भाषणामध्ये तुम्ही किती गलिच्छ आणि खालच्या पातळीवर बोलताय. त्यांच्या वयाला आणि कुणालाच हे शोभणारं नाहीय”, असं त्या संतप्त झाल्या. हे बरोबर आहे की ते विरोधक राहिलेले आहेत, पण विरोधकाला देखील एक पातळी असते.
त्या एवढ्या खालच्या पातळीला जाऊन तुमच्या मुलीच्या, तुमच्या नातीच्या वयाच्या मुलीबद्दल असं बोलताय. ते त्यांना शोभणारं नाहीय.”माझ्या आजोबांनी त्यांना आधीसुद्धा खडकावून काढलेलं आहे. त्यांना सरळ करण्याचं काम माझ्या आजोबांनी केलं होतं, मध्यंतरी आमच्या महिलांनी देखील त्यांच्याविरोधात मोर्चा काढला होता. अशा माणसाला ते लोकं कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान देतात, तर मला प्रश्न त्यांच्याबाबत पडतो’
‘. सुजय विखेंबाबत जयश्रीताई यांना प्रश्न विचारला गेला असता त्या म्हणाल्या की, ”मला एवढंच त्यांना सांगायचं आहे की, त्यांच्या कार्यक्रमात ते अध्यक्ष होते, त्यांच्या कार्यक्रमात ते बोलते होते, त्यांनी बसवलेले ते अध्यक्ष होते. त्यांनी देखील काही भाषणं मागच्या दिवसात केलेले आहेत, ती तपासून घेतली पाहिजे. चाकूर गावामध्ये त्यांनी देखील माझ्यावर टीका केली आहे. ते स्वत:ला युवानेते म्हणतात ना,
तर त्यांनी युवानेत्याची पातळी जपली पाहिजे. कारण राजकारणात एवढ्या खालच्या पातळीवर जाणारे लोकं कुणीही मान्य करु शकत नाही.