भारतीय जनता पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून जी काही कडक कारवाई वसंत देशमुख याच्यावर झाली पाहिजे, ती आम्ही करू.” असे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी संगमनेरमधील धांदरपळ येथे झालेल्या सुजय विखे यांच्या एका कार्यक्रमात वसंत देशमुख यांनी वादग्रस्त विधान केले होते. त्यावर आता भाजपने कारवाईचे आदेश दिले आहे.
“जयश्रीताई थोरात या माझ्या मुलीप्रमाणे आहेत, त्या आमच्या परिवारातील एक घटक आहेत. बाळासाहेब थोरात आणि आमच्यात कितीही राजकीत मतभेद असले तरीही राज्यातील सर्वच पक्षाच्या नेत्यांशी आमचे पारिवारिक संबंध आहेत. जयश्री थोरात यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल वसंत देशमुखांवर निवडणूक आयोगाने कडक कारवाई केली पाहिजे. पोलिसांनीही त्यांच्यावर कडक कारवाई करत,
जिथे असतील तिथून त्यांना ताब्यात घेतले पाहिजे. कारण, जयश्री थोरात यांचा अपमान हा सहन करण्यासारखा नाही. भाजप पक्ष हा या बाबतीत पूर्णपणे जयश्री थोरात यांच्या पाठीशी उभा आहे.” असे म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली बाजू मांडली.
पुढे बावनकुळे म्हणाले की, “वादग्रस्त विधान वसंत देशमुखांनी केले. पण या घटनेचा गैरफायदा घेत तिथे काही काँग्रेस किंवा इतर विरोधी पक्षातील लोकांनी सुजय विखे पाटील यांच्यावर हल्ला केला. सुजय विखे पाटील यांच्यावर जो जीवघेणा हल्ला झाला, आम्ही त्याचाही निषेध करतो. या भ्याड हल्ल्यात जे कोणी दोषी आहेत, त्यांच्यावरही पोलिसांनी कारवाई केली पाहिजे.” अशी मागणीदेखील त्यांनी यावेळी केली.
तसेच ते पुढे म्हणाले की, “सुजय विखे पाटील यांचा काही दोष नसताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. व्यासपीठावर वसंत देशमुख यांनी केलेल्या विधानाचे सुजय विखे पाटलांनी त्याचे समर्थन कुठेच केले नाही, त्यांनीदेखील देशमुखांच्या विधानाचा कडक शब्दात निषेध केला आहे. त्यामुळे भाजप वसंत देशमुखांवर कडक कारवाई करण्याच्या भूमिकेत आहे.”