शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी येथे एका हॉटेलमध्ये उतरलेल्या व राजस्थान मधून आलेल्या व्यक्तींनी हॉटेल चालक मालकाशी खोटे बोलून कोपरगाव येथे चोरीचे सोने विकून गुन्हा केल्याने व त्याचा आणखी तपास करण्यासाठी राजस्थान पोलीस शिर्डीत व कोपरगाव येथील सोनाराकडे गेल्याची खात्रीशीर माहिती असून या प्रकारामुळे शिर्डी व परिसरात मोठे खळबळ उडाली असून त्याची चर्चाही सध्या आपापसात सुरू असल्याचे दिसून येत आहे.
या संदर्भात अशी माहिती समजते की,शिर्डी येथील संस्थांनच्या पाचशे रूमच्या मागे असलेल्या एका खाजगी हॉटेल मध्ये काही दिवसा पूर्वी राजस्थानाचे काही लोकांनी शिर्डीत येऊन येथे रूम घेतले होती. तेथे थांबले नंतर त्यांनी हॉटेल मालकाला सांगितले कि, आमच्याकडील पैसे संपले आहेत.
आमच्याकडे जाण्यासाठी पैशे शिल्लक नाहीत .आमच्याकडे सोने आहे ते विकायचे आहे. आपल्या परिचयाचे कोणी सोनार असेल तर सांगा, तेव्हा हॉटेल मालक पवार यांनी त्यांना कोपरगाव येथे सोनाराकडे नेले आणि त्यांच्याकडील सोने विकले आणि ते त्या सोनाराकडून पैसे घेऊन निघून गेले .त्यानंतर त्यांना राजस्थान पोलीसांनी सोने चोरी प्रकरणात अटक केली
आणि त्यांच्याकडे सोन्याची चौकशी केली असता त्यांनी आम्ही शिर्डीला गेलो होतो पैसे संपल्याचा बहाणा करत कोपरगावला हॉटेल मालकाला घेऊन तेथे ते सोने विकले आहे. त्यानंतर राजस्थान पोलीस अधिक तपासासाठी त्यांना घेऊन शिर्डीत आले, आणि हॉटेल मालक पवार यास ताब्यात घेऊन कोपरगावच्या त्या सोनाराकडे घेऊन गेल्याचे समजते. दरम्यान शिर्डीत आपापसात तशी चर्चा, कुजबूज सुरू आहे.
शिर्डीत कोण काय उद्देश ठेवून येतो, हे समजत नाही. नवीन चेहरा, नवीन माणसे असल्यामुळे कोण काय करतो, हे लक्षात येत नाही. त्यासाठी प्रत्येकाचे ओळखपत्र घेणे महत्त्वाचे आहे. तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास पोलिसांशी संपर्क करणे महत्त्वाचे आहे. असे आता सर्वसामान्य नागरिकांमधून बोलले जात आहे.