रुपाली चाकणकर वसंत देशमुखांच्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत बोलताना म्हणाल्या, राज्य महिला आयोगाच्यावतीने जाहीर निषेध करतो. याबाबतचा अहवाल राज्य महिला आयोगाला देण्याचे आदेश दिले आहे. याबाबत कारवाई व्हावी. तर जयश्री थोरात यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर बोलताना त्या म्हणाल्या,
जाहिरात
आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. कोणतीही घटना घडली की लाडकी बहीणीशी त्याचा संबंध जोडला जातो. प्रत्येक स्त्रीला सन्मानाची वागणूक दिली जाते. कोणी महिलेच्या सन्मानाला ठेच पोहचवत असेल असं वक्तव्य करत असेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल. तपास अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत.