जयश्री यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. हे पराकोटीचं दुर्दैवी कृत्य सरकार करतं आहे. महाराष्ट्रातील जनता या कृत्याचा निषेध करतील. एकीकडे लाडकी बहीण म्हणायचं आणि दुसरीकडे बहिणीचे हे हाल करायचे. हे केवळ मतांकरिता केलेले कृत्य आहे. अशी घणाघाती टीका काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.विखेंना टार्गेट करायचं काहीच कारण नाही. वक्तव्य करताना विखे टाळ्या वाजवत होते. त्यांच्या पक्षातल्यांना हे आवडलं नाही. महाराष्ट्रातील पाच वर्षात राजकरणाची पातळी बदलली होती. मात्र कालच्या घटनेने याचा तळ गाठलेला आहे. माझी मुलगी आहे म्हणून वाईट वाटत नाही. तर समस्त महिला वर्गाला ही शिवी दिलेली आहे.निवडणूक आयोगाकडे कायदेशीर तक्रार करू. असा आक्रमक पवित्राही काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी घेतला आहे.
जाहिरात