काल अद्वय हिरे यांच्यावर दादा भुसे यांच्या गुंडांनी हल्ला केला. अद्वय हिरे यांना ठार मारण्याच्या उद्देशाने हा हल्ला झाला आणि पोलिसांनी कार्यवाही केली नाही. पोलीस यंत्रणेचा वापर करून अशा पद्धतीने जर हल्ले होत असतील तर या महाराष्ट्रात निवडणुका त्यांना शांततेत पार पाडायच्या नाहीत.
या राज्याच्या पोलिस महासंचालिका रश्मी शुल्का यांची बदली करावी अशी मागणी आमची यासाठीच होती कारण पोलिस यंत्रणा राजकीय कामाला जुंपलेली आहे. इथल्या पोलीस आयुक्तांची बदली करावी हे मागणी आमची यासाठी होती की इथल्या निवडणुका स्वच्छ वातावरणात होणार नाही हा आमचा अंदाज होता आणि तो खरा ठरतोय, असं संजय राऊत म्हणाले.
विशेष म्हणजे काँग्रेसकडून पदावरून हटवण्यासाठी आग्रही मागणी करण्यात येत आहे. याचदरम्यान, शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची तात्काळ बदली करा, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
नेहमीप्रमाणे होत असलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.दादा भुसे यांच्या त्या कार्यकर्त्याला कार्यकर्त्यांनी ठेचलं त्यामुळे अद्वय हिरे वाचले. अमित शाह बाहेर राज्यात दौरे करून महाराष्ट्रात आम्ही कसे जिंकणार हे सांगत आहेत अशा प्रकारे तुम्ही निवडणुका जिंकणार आहात का? राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची तात्काळ बदली करा
अशी मी निवडणूक आयोगाला मागणी करतोय. स्वतःहून कोण अर्ज मागे घ्यायला जात नाही. काही जुन्या केसेस बाहेर काढणार तपासणी करण्याच्या धमक्या देणे अद्वय हिरे यांना पहिल्यापासून धमक्या येत होत्या. काल त्यांच्यावर हल्ला अनेक ठिकाणी आमच्या उमेदवारांना धमक्या दिल्या जात आहेत.