श्रीरामपूर येथे मटक्याचा व्यवसाय असून तक्रारदार यांचे मटक्याचे व्यवसायावर कारवाई न करता मटक्याचा व्यवसाय चालू ठेवण्याकरता पोलीस नाईक रघुवीर ओंकार कारखिले यांनी तक्रारदार यांच्याकडे 6000/- रुपये लाचेची मागणी केल्याबाबतची तक्रार दि.06/09/2024 रोजी ला.प्र.वि. अहिल्यानगर येथे प्राप्त झाली होती. सदर लाच मागणी तक्रारीच्या अनुषंगाने दि.06/09/2024 रोजी लाच मागणी पडताळणी करण्यात आली.
लाच मागणी पडताळणी दरम्यान पोलीस नाईक रघुवीर ओंकार कारखिले यांनी तक्रारदार यांच्याकडे त्यांच्या मटक्याच्या व्यवसायावर कारवाई न करता व्यवसाय चालू ठेवण्यासाठी 6000/- रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती 5000/- रुपये लाचेची मागणी केली.
त्यानंतर आरोपी लोकसेवक कारखिले यांनी तक्रारदार नको म्हणत असताना त्यांना त्यांच्या मटक्याच्या व्यवसायाच्या ठिकाणी घेऊन जाऊन त्या ठिकाणावरून तक्रारदार यांच्याकडून 4000/- रुपये त्यामध्ये पाचशे रुपये दराच्या आठ भारतीय चलनी नोटा अशी रक्कम स्वीकारली व उर्वरित 1000/- रुपये व दारूच्या खंब्याची मागणी केली
व पोलीस कॉन्स्टेबल राहुल महादेव नरवडे यांनी तक्रारदार यांच्या मटक्याचे व्यवसायावर कारवाई न करता त्यांचा मटक्याचा व्यवसाय चालू ठेवण्यासाठी 2600/- रुपये किंमतीची हंड्रेड पाईपर कंपनीची दारूच्या बाटलीची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शवली व पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरवडे यांनी मागणी केलेली दारूची बाटली आणण्यासाठी पोलीस कॉन्स्टेबल गौतम शंकर लगड यांनी तक्रारदार यांना प्रोत्साहन दिले. सदर बाबत तिन्ही आरोपी लोकसेवक यांचेविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे