शिर्डी ( प्रतिनिधी) शिर्डी शहरातील लक्ष्मीनगर मध्ये महा विकास आघाडीच्या व काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार प्रभावतीताई घोगरे यांनी सदिच्छा भेट दिली व येथील रहिवासी,नागरिकांशी संवाद साधला, महिलांशी संवाद साधला, त्यामध्ये आवर्जून अनेक लोकांनी आज आम्ही ज्या घरात राहतो ते घर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी इंदिरा आवास योजना अंतर्गत दिलेले आहे.
तसेच ज्या इंदिरा गांधी यांनी त्यावेळी आम्हाला हे घर दिले आहे. त्याच पक्षाला आम्ही शंभर टक्के मदत करू तसेच अनेक फुल विक्री करणारे मुलांनी आपली चाललेली परिस्थिती सांगितली. अनेक छोटे व्यवसाय करताना येणाऱ्या अडचणी सांगितल्या.व प्रभाताई यांना विश्वास दिला की,
आम्ही जेवढे शक्य आहे तेवढे महाविकास आघाडीच्या उमेदवारालाच मतदान करू व यापुढील काळात ही चाललेली दडपशाही हुकूमशाही ही मोडीत काढू ! शिर्डीत साई मंदिरात हार फुलाबाबत मोठा प्रश्न प्रलंबित त्या संदर्भात महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर पहिल्यांदा आम्ही साईबाबा मंदिरात हर फुले प्रवेश चालू करू! असे आश्वासन यावेळी प्रभावती घोगरे यांनी दिले.
काल सावळीविहीर बुद्रुक येथेही सौ प्रभावतीताई घोगरे यांनी विविध ठिकाणी भेटी दिल्या. मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. तसेच त्यांनी बुद्धवासी अनिल वाघमारे यांच्या जलदान विधीच्या कार्यक्रम स्थळी जाऊन त्यांचे चिरंजीव सतीश व पप्पू वाघमारे व कुटुंबातील सदस्यांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. सांत्वन केले. या वेळी त्यांच्या समवेत अशोकराव आगलावे, साहिल म्हस्के, सुनिता गोकुळ जपे, दिनेश आरणे, बाळासाहेब काशीद, डॉ. शरद भदे, आदी उपस्थित होते.